मुंबई : आपल्या तोंडामध्ये किती दात असतात अशा प्रश्न विचारल्यावर हमखास प्रत्येकाचं उत्तर हे 32 असंच असेल. मात्र आम्ही तुम्हाला सांगितलं की एका व्यक्तीच्या जबड्यातून 32 दात निघाले तर...नक्कीच हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र हे खरं आहे. अशी घटना घडली आहे ती देखील पटन्यामध्ये. या घटनेमुळे डॉक्टर देखील चक्रावले आहेत.
बिहारमध्ये राहणारा 17 वर्षीय नितीश कुमार. गेल्या पाच वर्षांपासून त्याला कॉम्प्लेक्स ओडोन्टोम हा जबड्यातील एक दुर्मिळ ट्युमर होता. त्याच्या जबड्याला प्रचंड सूज आली होती. हे दात त्याच्या तोंडात नाही तर जबड्याच्या आत होते. त्याच्या जबड्यातील ट्युमरमध्ये हे दात होते.
त्याला पटनातील IGIMS मध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं. या ठिकाणी तपासणीनंतर जबड्यातील ट्युमर बाहेर काढण्यात आला. यामध्ये तब्बल 82 दात होते.
IGIMS रूग्णालयातील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, "आरा जिल्ह्यातील 17 वर्षांचा नितीश कुमार गेल्या 5 वर्षांपासून कॉम्प्लेक्स ओडोन्टोम या जबड्याच्या ट्युमरने ग्रस्त होता. यासाठी त्याला योग्य उपचार मिळत नव्हते. यानंतर तो आईजीआईएमएस रूग्णालयात आला होता. त्याचवेळी प्राथमिक तपासात त्याला कॉम्प्लेक्स डोन्टोम हा दुर्मिळ ट्युमर असल्याचं निदान झालं."
या मुलाच्या दोन्ही गालाच्या खालील बाजूला तसंच मानेच्या वर दोन्ही दिशेने असे हे ट्युमर होतो. डॉ. प्रियंकर सिंह आणि डॉ. जावेद इकबाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, "जबड्याचा हा एक असामान्य असा ट्युमर आहे. आनुवंशिक कारण किंवा जबड्याला झालेल्या दुखापतीमुळे किंना हानी पोहोचल्यामुळे जबडा किंवा दातांचा विकास होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो."
या रुग्णाच्या ट्युमरच्या आत जवळपास 82 दात असल्याची डॉक्टरांनी माहिती दिली आहे. हे दात त्याच्या जबड्यातून योग्यरित्या बाहेर काढण्यात आले आहे.