मुंबई : आरोग्यासाठी निसर्गात अनेक महत्त्वाच्या वस्तू आहेत जे आपलं शरीर आरोग्यदायी ठेवतात. अंजीर देखील असंच एक फळ आहे. अंजीरमध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतात. अंजीर हे थंड असले तरी ते पचण्यास थोडं जड आहे. सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते.
1. पोट साफ करण्यासाठी अंजीरचा मोठा फायदा होतो. खावे. अंजीरमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे पोट साफ होतं.
2. अंजीरमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे आजारांपासून ऱक्षण होतं.
3. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर उत्तम आहे.
4. जागरण झाल्यास चहा किंवा इतर पदार्थ खाण्यापेक्षा अंजीरचं सेवन करावं.
5. अशक्तपणा जाणवत असेल तर अंजीर खावे.