मुंबई : ग्रुमिंगच्या नावाखाली अनेकदा मुलं अनेक छोट्या छोट्या चुका करतात. ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील त्वचेला भरपूर नुकसान होतं. पुरूषांनी मान्य करो अथवा न करो पण त्यांना हँडसम दिसण्यासाठी ग्रुमिंगची भरपूर गरज असते. त्यामुळे जाणून घ्या अशा गोष्टी ज्यामुळे मुलांची त्वचा तजेल आणि ते हँडसम दिसण्यासाठी मदत होते.
तुमच्या चेहऱ्याचा लूक अधिक चांगला करण्यासाठी आयब्रो खूप महत्वाचे ठरतात. पातळ आयब्रो न ठेवता जाड आयब्रो मुलांना चांगले दिसतात.
जर पुरूषांच्या चेहऱ्यावर संपूर्ण दाढी येत असेल तर ती चांगली सेट करा. मात्र जर कुणाला दाढी येत नसेल तर त्यांनी क्लिन शेव करावी. अशा लोकांनी कधीच दाढीसोबत एक्सपेरिमेंट न करो.
वातावरणानुसार डिओची निवड करा. असा फ्रेगरेंस निवडा जो तीव्र नसेल. असा डिओ निवडा ज्यामुळे लोकांना तुमचा सहवास आवडेल.
चेहऱ्यावरील कोणत्या भागात केस असतील तर ते नक्की काढा. काही लोकांच्या कानावर केस असतात. जर तुम्ही प्रोफेशनल काम करत असाल तर त्याचा प्रभाव चांगला होत नाही.
चेहऱ्याची त्वचा नरम असते. यामुळे साबणचा वापर करू नका. हर्बल फेसवॉशचा वापर करून मॉउश्चारायजर लावा.