पुरुषांसाठी 'पॉवर हाऊस'चं कार्य करतात हे ७ पदार्थ

 चांगली शरिरयष्टी कमावण्यासाठी पुरूषांना व्यायामासोबत चांगल खाद्य खाणंही महत्त्वाचं आहे. 

Updated: Aug 31, 2018, 09:52 AM IST
पुरुषांसाठी 'पॉवर हाऊस'चं कार्य करतात हे ७ पदार्थ title=

मुंबई : पुरुष आणि महिलांचं शारिरीक आरोग्य वेगळं असतं. शरीर तंदुरूस्त असल्यावर पुरूषांमध्ये आत्मविश्वास येतो आणि आपण अधिक उर्जावान असल्याचे त्यांना जाणवते. महिलादेखील तंदुरूस्त आणि बॉडी बिल्डर पुरूषांना पसंत करतात. चांगली शरिरयष्टी कमावण्यासाठी पुरूषांना व्यायामासोबत चांगल खाद्य खाणंही महत्त्वाचं आहे. 

बदाम, स्प्राउट, मिल्क आदिंच्या सेवनाने शरीर अशा पॉवर फूडचा समावेश करणं गरजेचं आहे.

रेड मीट 

बीफ किंवा रेड मीट शरीराला मजबूत बनवते. रेड मीटमध्ये प्रोटीन, जिंक आणि विटामिन बी सर्वाधिक असतं. हे शरिराला उच्च कॅलरी आणि ताकद देते.

मच्छी 

मच्छीमध्ये ओमेगा ३ सर्वाधिक असतं ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते आणि मांसपेशिय तयार होण्यास मदत होते. बॉडीमध्ये जास्त फॅट असल्यास बाकीचं खाणं कमी करुन केवळ मच्छी खाल्ल्यास पर्याप्त उर्जा मिळते.

ब्रोकोली 

शारिरीक तंदुरूस्ती हवी असल्यास ब्रोकोलीचं सेवनं आवश्यक आहे. ब्रोकोलीमध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते जे मांसपेशी मजबूत करते. यामुळे पोटासंबधी कोणत्या समस्या जाणवत नाहीत. यामुळे मेटाबोल्जिम सुधारते आणि वजन कमी होते.

सोयाबीन

शरीर फक्त नॉन-शाकाहारी खाल्ल्याने सुदृढ बनते असे नाही.  शाकाहारीमध्ये तुम्ही सोयाबीन, मटार, कडधान्यामध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असतात. यामुळे शरीरास बळकटी होते. याचे नियमित सेवन केल्याने शरिर क्षमता वाढण्यास मदत होते. 

लापशी

लापशी खाल्यानंतर शरीराला संपूर्ण दिवस ऊर्जा मिळते. या सेवनमुळे शरीरात कोलेस्टेरॉल वाढत नाही आणि अॅनाबॉलिक प्रक्रिया वाढू लागते तसेच शरीरात ग्लुकोजची मात्रा नियंत्रित होते.

अंड्याचा सफेद भाग 

अंड्यामध्ये आठ प्रकारचे अमीने एसीड असते जे शरीराच्या निर्माणासाठी आवश्यक असते आणि मांसपोशी निर्माण करते. याशिवाय अंड्यामध्ये विटामिन, एसिड आणि अन्य पोषक तत्वदेखील असतात.

पनीर 

पनीर खाल्ल्याने तोंडाची चव बदलते असे काहींना वाटते पण याच्या सेवनाने मांसपेशी निर्माण होण्यास मदत होते. याच्या सेवनाने बराच वेळ भूक लागत नाही.