कमालीचा बॅलेन्स साधत पतीसोबत योगा करणार्‍या 'या' अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकलेली आशका गरोडिया पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. 

Updated: Apr 21, 2018, 12:51 PM IST
कमालीचा बॅलेन्स साधत पतीसोबत योगा करणार्‍या 'या' अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकलेली आशका गरोडिया पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वी पतीसोबत किस करण्याचा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियामध्ये खूप चर्चा रंगल्या होत्या. आता आशका पुन्हा इंस्टाग्रामवरील एक फोटोमुळे चर्चेचा विषय बनली आहे. 

आशकाचा खास व्हिडिओ  

बिग बॉस 6 या रिएलिटी शोचा भाग असलेली आशका सध्या इंस्टाग्रामवर खास चर्चेचा विषय बनली आहे. आशका गरोडियाने पतीसोबत योगा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या योगा व्हिडिओमध्ये तिचा बॅलेन्स खास वाखाण्याजोखा आहे.

व्हिडियोमध्ये आशका पतीच्या पायांवर शरीराचा भार सांभाळत तरंगताना दिसत आहे. यामध्ये आशका आणि ब्रॅटच्या एकमेकांना कॉम्प्लिमेंट करण्याच्या खास अंदाजाची वाहवा होत आहे. 

आशका नागिन आणि नागिन 2 मध्ये अवंतिका महेष्मतीची भूमिका साकारत आहे.आशकाच्या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक लोकांनी पसंत केले आहे. यामध्ये पतीला इंस्टाग्रामवर टॅग करताना आशकाने विश्वास, बॅलेन्स असे हॅशटॅग वापरले आहेत. 

 

@ibrentgoble  #trust #balance #onelove #acroyoga #yoga

A post shared by Aashka Goradia Goble (@aashkagoradia) on

परदेशी मुलाशी विवाहबद्ध  

हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करणार्‍या आशका गोराडियाने ब्रॅड गोल्बे या परदेशी तरूणासोबत लग्न केले. मागील वर्षी 3 डिसेंबरला हिंदू आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्मानुसार लग्न केले.