Health tips: दुधामध्ये 'ही' गोष्ट टाकल्यास वाढते ताकद!

दुधाची आणखी एक गोष्ट मिसळलीत तर तुम्हाला त्याचे आणखी मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

Updated: Oct 26, 2022, 10:43 PM IST
Health tips: दुधामध्ये 'ही' गोष्ट टाकल्यास वाढते ताकद! title=

Milk at Night : निरोगी आरोग्यासाठी रात्री झोपताना किंवा सकाळी नाष्ट्यामध्ये दुधाचा समावेश केला जातो. दुधामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन आणि विटामिन हे तिन्ही गुणधर्म असतात. दुधाची आणखी एक गोष्ट मिसळलीत तर तुम्हाला त्याचे आणखी मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. नक्की कोणती ती खास गोष्ट आहे ती जाणून घ्या. (Adding honey to milk is even more beneficial for health Marathi News)

दुधामध्ये एक चमचा मध मिसळून ते प्यायल्याने त्याच्या अनेक औषधी गुणधर्मांच शरीराला उपयोग होतो. मधात अँटी बॅक्टेरियटल गुण असल्याने ते आपले रोगांपासुन रक्षण करते अशात जर दुध आणि मध सोबत घेतले तर आपल्या आरोग्याला याचा खुप फायदा होतो.

दुधात मध मिसळुन प्या, सर्वप्रथम दुध गरम करुन घ्यावे कारण कच्या दु्धात बॅक्टेरिया असु शकतात. त्यानंतर एक ग्लास कोमट दुधात एक चमचा मध टाका. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण प्या काही दिवसातच तुम्हाला फायदे दिसु लागतील.

दुध आणि मध दोन्हीही इम्यूनिटी बूस्टर प्रमाणे काम करतात. दुधात मध मिसळु्न घेतले तर आपली इम्यूनिटी वाढते सोबतच बऱ्याचश्या आजारांपासूनही लढण्याची ताकद देते, दुधात मध टाकून घेतल्यास सर्दी, पडसे आणि खोकल्यातही आराम मिळतो.

दुधात मध टाकून घेतल्यास शरीरातील थकवा दूर होतो सोबतच शारीरिक कमतरता देखील दूर होते. असे दुध प्यायल्याने रात्री झोप छान लागते आणि झोप चांगली झाल्याने सकाळी शरीरात ऊर्जा देखील जाणवते.
  
दुध शरीराला मजबुत बनवते, पण फक्त दुध पिण्यापेक्षा आपण सोबत जर मध घातले तर आपले कमी झालेले वजन वाढण्यास देखील मदत होते. मधातील कॅलरीज आणि कार्ब्स दुधातील हेल्दी फॅट्स सोबत मिसळुन वजन वाढवण्यास मदत करते.
 
मधात असलेले एंजाइम आपले पाचन तंत्र मजबूत बनवते. रात्री झोपताना मध आणि दूधाचे मिश्रण प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते.अशा प्रकारे दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि अपचनावर मात करता येते. पोट साफ करण्यासाठी दूध आणि मधाचे मिश्रण नक्कीच घेतलं पाहिजे.