WHO Priority Pathogens: कोरोनातून जग सावरलंय, कोरोना जगातून हद्दपार करण्यासाठी आता युद्धपातळीवर प्रयत्न होतायत. पण याचदरम्यान एका नव्या व्हायरसची भिती शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. सध्या या व्हायरसला X असं नाव देण्यात आलंय. हा व्हायरसच भविष्यातील एखाद्या महामारीचं कारण ठरु शकतो असा दावा WHOच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आलाय.
हा व्हायरस कोरोनाप्रमाणे थैमान घालू शकतो. यासाठी डब्ल्यूएचओने 300 शास्त्रज्ञांची एक टीम तयार केली आहे. ही टीम भविष्यात साथीचे रोग पसरवणारे बॅक्टेरिया ओळखू शकेल. यासोबतच ही टीम या व्हायरसची लस आणि त्यावरच्या उपचारांवरही काम करणार आहे.
भविष्यात कोरोनासारखी कोणतीच महामारी पसरु नये यासाठी WHO कडून अनेक बॅक्टेरिया, व्हायरसवर संशोधन सुरु आहे. त्याचदरम्यान WHOला X व्हायरसबद्दल माहिती मिळालीय. कोरोनापेक्षा अधिक भयंकर हा व्हायरस असल्याचं WHOचं म्हणणं आहे, त्यामुळेच या व्हायरसवर संशोधन सुरु आहे.