Measles Outbreak : महाराष्ट्रात गोवर साथीच्या (Measles) आजाराने थैमान घातलंय. लहान मुलांनाही मोठ्याप्रमाणात या आजाराची लागण होताना दिसतोय. यामध्ये मुंबईनंतर (Mumbai) ठाण्यातील भिवंडीमध्ये गोवर, रुबेला आजाराने कहर केलाय. गोवरच्या साथीचं गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने यासंदर्भात एक बैठक बोलवाली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माहिती दिली की, या बैठकीत एक बालक दुसऱ्यांच्या संपर्कात येतायत का ते पाहतोय. ज्या ठिकाणी लसीकरण झालं नसेल तिथे ते करणं गरजेचं आहे. बालकांना लस देण्याचं काम सुरू आहे. 6 महिन्याच्या बालकांना लस देता येईल याचा विचार सुरू आहे. यावर एक्सपर्ट कमिटी अभ्यास करतेय. ही समितीच याबाबत निर्णय देईल. शिवाय याबाबत जागरूकता होणं गरजेचं आहे."
डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या, "गोवरसंदर्भात अनेक ठिकाणी लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे सध्या हे वाढवणं गरजेचं आहे. 84 टक्के लसीकरण काही ठिकाणी झालंय. काही राज्यात 60 टक्के लसीकरण झालं आहे."
दरम्यान काल मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती हाती आली आहे. नालासोपारा येथील एक वर्षीय मुलाचा आज उपचारा दरम्यान मुंबईत मृत्यू झालाय. त्यामुळे आता मुंबईत गोवरमुळे मृत बालकांची संख्या पोहचली 11 वर पोहोचली आहे. अशातच आता मुंबईत सध्या गोवर रूग्णांची संख्या (Total Patient) पोहचली 220 वर पोहचली आहे.
गोवरची बाधा होण्यात सर्वाधिक प्रमाण लहान बालकांचं (measles child) आहे. त्यात आता 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे. त्यामुळे तुमच्या लहानग्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस द्या (vaccine) आणि काळजी घ्या, असं आवाहन देखील करण्यात आलंय.