कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची दहशत?; रूग्ण सापडल्याने चिंता वाढली

काही लोकांना या व्हेरिएंटची लागण झाल्याचंही समोर आलं आहे.

Updated: Feb 19, 2022, 01:09 PM IST
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची दहशत?; रूग्ण सापडल्याने चिंता वाढली title=

ब्रिटन : कोरोनाचे एकामागोमाग एक व्हेरिएंट येत आहेत. ओमायक्रॉन आणि डेल्टानंतर आता कोरोनाचा डेल्टाक्रॉन हा व्हेरिएंट समोर आला आहे. हा डेल्टा आणि ओमायक्रॉन मिळून एक हायब्रिड स्ट्रेन बनला आहे. मुख्य म्हणजे ब्रिटनमध्ये काही लोकांना या व्हेरिएंटची लागण झाल्याचंही समोर आलं आहे.

ब्रिटनमधून समोर आली डेल्टाक्रॉनची प्रकरणं

यूकेच्या हेल्थ सिक्युरिटी एजेंसीने दिलेल्या माहितीप्रमाणे, अजून तज्ज्ञांना या व्हेरिएंटबाबत जास्त माहिती नाहीये. हा व्हेरिएंट किती संसर्गजन्य आणि गंभीर आहे याची माहिती घेणं बाकी आहे. त्याचप्रमाणे, याची लक्षणं आणि वॅक्सिन याविरोधात किती प्रभावी आहे याचीही माहिती अजून तज्ज्ञांना नाही.

डेली मेलशी बोलताना तज्ज्ञ प्रोफेसर पॉल हंटर म्हणाले, कोरोनाच्या या व्हेरिएंटमुळे जास्त धोका निर्माण होईल असं वाटत नाही. कारण की, युकेमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉन विरोधात एंटीबॉडीज तयार आहेत.

डेल्टाक्रॉन हायब्रिड व्हेरिएंट 

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हा एक सुपर सुपर-म्यूटेंट व्हायरस आहे. ज्याचं नाव शास्त्रज्ज्ञांनी BA.1 + B.1.617.2 असं ठेवलंय. डेल्टा आणि ओमायक्रॉन हे दोन्ही व्हेरिएंट मिळून हा एक हायब्रिट व्हेरिएंट बनला आहे. या व्हेरिएंटला साइप्रसच्या संशोधकांनी शोधलं होतं.