तुम्ही पण खूप हसता? 'बाहुबली'फेम अभिनेत्रीला Laughing Disease चा त्रास; काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणं?

जास्त हसणे हे स्यूडोबुलबार डिफेक्ट म्हणून ओळखला जात असून ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. यामध्ये मेंदूवर परिणाम होतो आणि अनियंत्रित हसणे किंवा रडणे असा परिणाम होतो. 

नेहा चौधरी | Updated: Jun 26, 2024, 12:15 PM IST
तुम्ही पण खूप हसता? 'बाहुबली'फेम अभिनेत्रीला Laughing Disease चा त्रास; काय आहे हा आजार आणि त्याची लक्षणं? title=
Anushka Shetty suffering from laughing disease What is this disease and its symptoms

Anushka Shetty suffering from laughing disease : आरोग्य तज्ज्ञ सांगतात की हसणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आजकाल तुम्हाला उद्यानात एक गट मोठ्या मोठ्यांनी हसताना दिसतात. हे सगळे लाफिंग क्लबचे मेंबर असतात. जे जोरजोऱ्यात हसून आरोग्यासाठी व्यायाम करतात. आनंद व्यक्त करणे किंवा एखाद्या मजेदार वाक्यामुळे आपल्याला हसू येतं. तज्ज्ञ सांगतात हसल्याने आपल्या ताण कमी होतो. हसतमुख व्यक्ती ही सर्वांना खूप आवडते. तिच्यामुळे घरात आनंदी वातावरण असतं असं मानलं जातं. शिवाय हसल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढली जाते. तसंच डोपामाइन आणि एंडोर्फिनची पातळी वाढवून उदासीन मनःस्थिती सुधारण्यास मदत करते. (Anushka Shetty suffering from laughing disease What is this disease and its symptoms)

हसणे हा हृदय आणि मनासाठी चांगला व्यायाम मानला जातो. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आत्म्याला ताजेतवाने करणारे हे हास्य देखील एक रोग असू शकतं. होय, आम्ही तुम्हाला सांगतो की हसणे हा देखील एक आजार आहे.  हा आजार बाहुबली चित्रपट अभिनेत्री अनुष्का शेट्टीला झालाय.  

बाहुबली आणि अरुंधती सारख्या चित्रपटांनी प्रसिद्धी मिळवलेली अनुष्का शेट्टी एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती अनैच्छिकपणे हसते किंवा रडते. अभिनेत्रीने सांगितले की, तिला हसण्याचा विकार आहे ज्यामध्ये ती एकदा हसायला लागली की ती 15 ते 20 मिनिटं हसणे थांबवू शकत नाही.  इंडियाग्लिट्जच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, कॉमेडी सीन पाहताना किंवा शूटिंग करताना ती इतकी हसते की हसताना ती जमिनीवर लोळते आणि अनेक वेळा शूटिंग थांबवावे लागते. 

हसण्याचा आजार म्हणजे काय?

जास्त हसणे हे स्यूडोबुलबार डिफेक्ट म्हणून ओळखलं जातं. ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती असून जी मेंदूवर परिणाम करते. त्यामुळे आजारग्रस्त व्यक्ती अनियंत्रित हसतो किंवा रडतो. स्यूडोबुलबार डिफेक्ट (पीबीए) ही एक न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. ज्यामध्ये अचानक, अनियंत्रित हसणे किंवा रडणे अशा घटना होतात. जे सध्याच्या परिस्थितीनुसार अत्यंत त्रासदायक ठरतं. हास्याचे हे भावनिक उद्रेक आजूबाजूच्या लोकांना चिडवू शकतात. PBA हा मज्जासंस्थेसंबंधीचा विकार किंवा मेंदूवर परिणाम करणाऱ्या जखमांशी संबंधित आजार असून यात स्ट्रोक, मल्टिपल स्क्लेरोसिस, अमायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस, मेंदूला दुखापत आणि अल्झायमर रोग होण्याची शक्यता असते. 

स्यूडोबुलबार प्रभावित लक्षणं

स्यूडोबुलबार प्रभावाच्या लक्षणांबद्दल बोलणे, ते वारंवारता आणि तीव्रतेमध्ये भिन्न असतं. या आजारामुळे, एखादी व्यक्ती एखाद्या दुःखद प्रसंगावर हसते किंवा एखाद्या मजेदार परिस्थितीत रडते आणि या घटना काही सेकंदांपासून कित्येक मिनिटांपर्यंत टिकून राहतात. PBA जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकते आणि लोकांमध्ये पेच निर्माण करते. ही परिस्थिती चिंता आणि नैराश्य वाढवते. 

स्यूडोबुलबार प्रभावाचा उपचार कसा केला जातो?

पीबीएच्या उपचारांमध्ये, या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं दिली जातात. या आजारावर नैराश्याच्या औषधांनीही उपचार करण्यात येतो. ही स्थिती ध्यानधारणेद्वारे देखील बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करतात.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)