Anxiety : अँक्झायटीमुळे खरंच वाढतो हार्ट अटॅकचा धोका? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात

Anxiety : नैराश्य आणि हृदयविकाराचा एकमेकांशी संबंध अनेक दशकांपासून ओळखला जातो. उदासीनतेमुळे हृदयविकार वाढू शकतात हे अनेक अभ्यासांद्वारे सिध्द करण्यात आले आहे.

Updated: Jun 16, 2023, 05:35 PM IST
Anxiety : अँक्झायटीमुळे खरंच वाढतो हार्ट अटॅकचा धोका? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात title=

Anxiety : सर्वच वयोगटातील लोकांमध्ये अँक्झायटी ( Anxiety ) ही एक सामान्य समस्या आहे. वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनातील तणाव, आरोग्याच्या समस्या आणि एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू यामुळे अँक्झायटी ( Anxiety ) वाढू शकते आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करु शकते. ही चिंता तुमचा रक्तदाब आणखी वाढवू शकते आणि हृदयविकाराच्या झटक्यास आमंत्रण देऊ शकते. 

नैराश्य आणि हृदयविकाराचा एकमेकांशी संबंध अनेक दशकांपासून ओळखला जातो. उदासीनतेमुळे हृदयविकार वाढू शकतात हे अनेक अभ्यासांद्वारे सिध्द करण्यात आले आहे.

अँक्झायटीमुळे होतो हृदयविकाराचा त्रास?

अँक्झायटीमध्ये ( Anxiety ) चिंता, पॅनीक डिसऑर्डर आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) यांचा समावेश होतो. चिंतेमुळे भीती निर्माण होऊ लागते. एखाद्याला पोटाच्या समस्या, डोकेदुखी, जलद हृदय गती आणि उच्च रक्तदाब देखील असेल. कालांतराने, तीव्र चिंतामुळे तीव्र टाकीकार्डिया आणि उच्च रक्तदाब होतो. उपचार न केलेल्या रक्तदाबामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.
 
हृदयाच्या समस्या तुम्हाला चिंताग्रस्त करू शकतात. एखाद्याला हृदयविकाराच्या झटक्याने ( Heart Attack ) पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) होऊ शकतो. पीटीएसडी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास संकोच बाळगु नका आणि विलंब न करता मदत घ्या. तुम्हाला तणावापासून मुक्त होण्यास मदत करणार्‍या थेरपी किंवा सपोर्ट ग्रुप्सचा फायदा होऊ शकतो.
 
मुंबईतील कार्डियाक सर्जन डॉ बिपीनचंद्र भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ज्ञात सत्य आहे की चिंता आणि हृदयाच्या समस्या त्वरित वैद्यकीय लक्ष देऊन व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात. व्यायामामुळे कोरोनरी धमनीमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होईल, कोर्टिसोलची पातळी कमी होते, मुड चांगला होतो आणि रक्तदाब कमी होतो. यासाठी दररोज 30 मिनिटे न चुकता व्यायाम करा. 

जीवनशैलीतील चांगले बदल करा, कमीतकमी 8 तास चांगली झोप घ्या. झोपेच्या कमतरतेमुळे देखील हृदयाच्या समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे झोप पूर्ण होईल याची काळजी घ्या. योग आणि ध्यान करून तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. वाचन करणे, गाणी ऐकणे, बागकाम करणे आणि नवीन कौशल्य किंवा भाषा शिकणे यासारखे छंद जोपासु शकता ज्यामुळे तणावापासून दूर राहण्यास मदत होऊ शकते, असंही डॉ. भामरे यांनी सांगितलंय. 

डॉ. भामरे पुढे म्हणतात, तुम्ही काय खाता याकडे लक्ष द्या. आहारात ताजी फळे, भाज्या,सर्व प्रकारचे धान्य, कडधान्ये, शेंगा आणि मसूर यांचा समावेश करा आणि आहाराच्या चांगल्या सवयींचे पालन करा. जंक फुड, तेलकट, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन टाळा. जर तुम्ही अनेकदा तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त असाल तर फक्त औषधोपचार आणि थेरपी घ्या. असे केल्याने हृदयाला आणखी नुकसान होण्यापासून वाचवता येते.