Diabetes अजिबात वाढणार नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

How To Control Diabetes : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत. जर तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर तुमच्या आहारत या गोष्टींचा समावेश करा. 

Updated: Jun 16, 2023, 05:01 PM IST
Diabetes अजिबात वाढणार नाही, आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश  title=
How To Control Diabetes

How To Control Diabetes News In Marathi : मधुमेह (Diabetes) हा झपाट्याने पसणारा आजार आहे ज्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. जेव्हा तुमच्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन नावाचे हार्मोन तयार करणे थांबवते किंवा कमी करते. वास्तविक हा हार्मोन रक्तातील साखर नियंत्रित ठेवत असतो. साहजिकच, जर हे अयशस्वी झाल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका असतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, जगातील सुमारे 422 दशलक्ष लोकांना मधुमेह आहे आणि सुमारे 1.5 दशलक्ष लोक दरवर्षी मधुमेहामुळे मृत्यूमुखी पडतात. अनेक औषधे हा मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी चांगला आहार आणि नियमित व्यायामाचा सल्ला दिला जातो. 

आहारात करा या गोष्टींचा समावेश

ओट्स (Oats)
ओट्समध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. मधुमेही रुग्णही ओट्स खाऊ शकतात. यामध्ये कॅलरीजही कमी असतात. बरेच लोक त्यांच्या वजन कमी करण्याच्या आहारात ओट्सचा समावेश करतात. यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेची पातळीही वाढत नाही. हे आतड्यांतील जीवाणूंसाठी प्रीबायोटिक म्हणून कार्य करते.

बार्ली (Barley)
बार्लीत 6 ग्रॅम फायबरचे प्रमाण असते. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. बार्लीचे सेवन केल्याने शरीरातील सूज कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. त्यामुळे आवर्जुन तुमच्या आहारात बार्लीचा समावेश करा.

छोले
छोले प्रथिने आणि फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात कमी GI आहे. पांढरे चणे हे हाडे, मेंदू आणि हृदयासाठी देखील चांगले आहेत. तुम्ही याचे सेवन भाज्या आणि कोशिंबीरच्या स्वरूपात करू शकता. मेम रॅफिनोज नावाच्या विरघळणाऱ्या फायबर छोलेमध्ये आढलतो. जे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

सफरचंद (chickpeas)
रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. सफरचंदात पेक्टिन नावाचा विद्राव्य फायबर आढळतो, ज्यामुळे साखरेचे शोषण कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध होतो.

सब्जा बिया (Vegetable seeds)
यामध्ये भरपूर फायबर असते जे चयापचय मंद करते आणि कार्ब्सचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यास प्रतिबंध करते. टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी सब्जाच्या बिया खूप फायदेशीर मानल्या जातात.

जर तुम्ही मधुमेह किंवा प्री-डायबिटीसच्या समस्येने त्रस्त असाल तर फायबर युक्त आहाराचे पालन करणे गरजेचे आहे. यासोबतच याविषयी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे. 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)