Corona Vaccination : भारतात कोरोना (Corona) विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) च्या ड्रग रेग्युलेटरच्या तज्ज्ञ पॅनेलने 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी Biological E's Corbevax लस आपतकालीन वापरासाठी मंजूर करण्याची शिफारस केली आहे.
5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी लस आणि वापर यावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ समितीच्या पॅनेलची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत लसीबाबत केलेल्या शिफारशी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी देण्यापूर्वी DCGI च्या मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लसीला DCGI ची मान्यता मिळताच 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन परिस्थितीत लस वापरली जाऊ शकते.
दिल्लीत लहान मुलांमध्ये कोरोनाचा वाढता धोका
दिल्ली, गाझियाबाद, नोएडा इथं लहान मुलांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. अलीकडेच गाझियाबादमधील अनेक शाळांमधील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर शाळा तात्पुरती बंद करावी लागली. अशा परिस्थिती 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराची शिफारस केल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.