सारखे लघवीला होत असेल, तर तुम्हाला असू शकतात हे आजार

वारंवार लघवी केल्याने आपल्या दिनचर्यावर, तसेच आपल्या झोपेवर देखील याचा परिणाम होऊ शकतो.

Updated: Jul 27, 2021, 03:30 PM IST
सारखे लघवीला होत असेल, तर तुम्हाला असू शकतात हे आजार title=

मुंबई : आपले शरीर अशा प्रकारे बनलेले आहे की, त्यातील प्रत्येक भागाचे विशिष्ट कार्य असते. आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीराची उत्सर्जित करणारी पध्दत स्वत: च्या मार्गाने कार्य करते. लघवी करणे ही आपल्या शरीरातील मलमूत्र प्रणालीची जबाबदारी आहे. परंतु जर कोणालाही वारंवार लघवी करण्याची समस्या असेल, तर हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण वारंवार लघवी केल्याने आपल्या दिनचर्यावर, तसेच आपल्या झोपेवर देखील याचा परिणाम होऊ शकतो. या व्यतिरिक्त हे आपल्या कोणत्याही वैद्यकीय स्थितीचे कारण देखील असू शकते.

याची सामान्य पातळी काय आहे?

जर आपल्याला वारंवार लघवी होण्याची समस्या येत असेल, तर आपण ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. जर एखादी सामान्य व्यक्ती दिवसातून 3 लिटरपेक्षा जास्त लघवी करत असेल. तर त्याला पोलोयूरिया नावाचा आजार होऊ शकतो. डॉक्टरांच्या उपचारातून हा आजार बरा होऊ शकतो. परंतु कधीकधी ही समस्या एकाच वेळी बर्‍याच रोगांचे कारणही बनू शकते.

आरोग्य तज्ञांच्या मते, एक सामान्य माणूस एकावेळी लघवीसाठी 4 ते 7 वेळा जातो. ते देखील जर तुम्ही 24 तासांत 2 लिटरपेक्षा जास्त पाणी किंवा द्रव प्यालात तर केवळ 4 ते 7 वेळा तुम्ही लघवीला जाऊ शकतात.

रोगांचे लक्षणे काय आहेत?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते आणि ही एक चुकीची गोष्ट आहे. आरोग्य तज्ञांनी वारंवार लघवी करणाऱ्या लोकांना या रोगांचे लक्षण असल्याचे सांगितले आहे.

प्रोस्टेटमध्ये वाढ
किडनी किंवा यूरेट्रिक स्टोन
मूत्रमार्गात इंफेक्शन Urinary Tract Infection (UTI)
डायबिटीज
गर्भधारणा
अतिसक्रिय ब्लॅडर (Overactive bladder)

या व्यतिरिक्त एन्झायटी, स्ट्रोक, मेंदू किंवा मज्जासंस्थेशी संबंधित कोणतीही समस्या, ओटीपोटाच्या भागात ट्यूमर,  ब्‍लॅडर कॅसर किंवा लॅगिक संक्रमित संसर्गामुळे (STI) देखील होऊ शकते.

शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जा

आरोग्य तज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा तुम्हाला वारंवार लघवी करण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो, तेव्हा लजेमुळे ते लपवू नका. योग्य वेळी डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता आणि आपले जिवन सामान्य जगू शकता.

डॉक्टरांच्या मते, वारंवार लघवी करणे, त्यातील अनियमिततेपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. काही आरोग्य तज्ञांच्या मते व्यायामाच्या सहाय्यानेही ही समस्या दूर केली जाऊ शकते. परंतु यामुळे तुम्हाला मधुमेहासारखा आजार देखील असल्याचे समोर येऊ शकते त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जा.