हा आजार मुलं जन्माला घालण्याची क्षमता हिरावून घेत आहे, दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू

असा एक आजार आहे की  मुलं जन्माला घालण्याची क्षमता हिरावून घेत आहे. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.  

Updated: Jul 27, 2021, 06:50 AM IST
हा आजार मुलं जन्माला घालण्याची क्षमता हिरावून घेत आहे, दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू title=

मुंबई : असा एक आजार आहे की,  मुलं जन्माला घालण्याची क्षमता हिरावून घेत आहे. दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. हायपरटेन्शन (Hypertension) ज्याला सायलेंट किलर म्हणतात. Hypertension हळूहळू लोकांचा जीव घेत नाही तर त्यांना मूल निर्माण करण्यास असमर्थ बनवत आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाने (FPA India) आपल्या अहवालात (Reproductive Health)हा इशारा दिला आहे.

उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे नाहीत

FPA Indiaची 72 वर्षे पूर्ण झाल्याने संस्थेने वेबिनार आयोजित केले होते. ज्यामध्ये आरोग्य तज्ज्ञाने असे म्हटले आहे की, बाह्यतः उच्चरक्तदाबाचे (Hypertension) लक्षण दिसून येत नाही. या आजाराने ग्रस्त असलेली एखादी व्यक्ती दूरवरुन पाहिली तर सामान्य दिसते, पण आतून तो खचलेला असतो. तो कोणालाही आपली निराशा सांगत नाही तर तो आतून पूर्णत: खचलेला असतो आणि हळू हळू या आजाराच्या जाळ्यात अडकतो.

कुटुंब नियोजनाशी संबंधित तज्ज्ञांनी वेबिनारमध्ये सांगितले की, कोरोना कालावधीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नोकरी गमावण्याची भीती, आजारपणात अडकण्याची चिंता आणि कुटुंबाच्या संगोपनामध्ये येणाऱ्या समस्यांमुळे लोक पूर्वीपेक्षा अधिक चिंतीत झाले आहेत. ज्यामुळे ते उच्चरक्तदाबचे (Hypertension)बळी बनत आहेत.

मुले जन्माला घातलण्याच्या क्षमतेवर परिणाम  

FPAच्या अध्यक्षा डॉ रत्नमाला देसाई म्हणतात की, उच्चरक्तदाबाची प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारने देशातील नियमित आरोग्य तपासणी शिबिरांसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या कार्यक्रमांमध्ये 35 ते 65 वर्षे वयोगटातील पुरुष आणि स्त्रियांना विशेष आमंत्रित केले जावे. वास्तविक हे मूल होण्याचे  (Reproductive Health)वय आहे. जर या वयोगटातील व्यक्ती एकदा उच्च रक्तदाबाचा बळी ठरली आणि त्यांच्यावर वेळेत उपचार केले गेले नाहीत तर ते मुले होण्याची क्षमता गमावू शकतात.

बच्चे पैदा करने की क्षमता छीन रहा Hypertension, हर साल 36 लाख लोगों की हो जाती है मौत

चंदीगड पीजीआय येथील डॉक्टर सोनू गोयल म्हणतात की, भारतात 15 ते 49 वर्षे वयोगटातील महिलांसाठी एक अभ्यास केला गेला. ज्यामध्ये असे आढळले की दर 5 पैकी एक महिला या आजाराने ग्रस्त आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलांना आजारी असल्याची जाणीवदेखील नसते. म्हणूनच त्यांना या आजारावर उपचारही मिळत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आणि मुलांना जन्म (Reproductive Health) देण्याच्या क्षमतेवरही होतो.

देशात 10 कोटीहून अधिक लोक त्रस्त  

उच्च रक्तदाब  (Hypertension)सामान्यत: उच्च रक्तदाब किंवा उच्च बीपीची समस्या म्हणतात. देशातील सुमारे 10 कोटी 13 लाख लोकसंख्येला ही समस्या भेडसावत आहे. हा आजार अपघाती मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. आकडेवारी सांगते की भारतातील जवळजवळ 30 टक्के प्रौढ सध्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत आणि त्याचे उपचार घेत आहेत. त्याचवेळी, या संख्येपेक्षा जास्त लोकांना त्यांच्या स्थितीबद्दल माहिती देखील नाही.

अहवालानुसार जगातील सीव्हीडीमुळे दरवर्षी 17.7 कोटी 70 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. डब्ल्यूएचओचा अंदाज आहे की, या मृत्यूंपैकी सुमारे 20 टक्के मृत्यू म्हणजेच एकट्या भारतातच 36 लाख लोकांचा मृत्यू होत आहेत. याचे कारण म्हणजे लोकांमध्ये उच्चरक्तदाबाविषयी जागरूकता नसते. यामुळे या आजाराने ग्रस्त लाखो लोकांना शोधता येत नाही आणि त्याच्यावर उपचार वेळेत सुरू करता येत नाही. ज्यामुळे प्रत्येक क्षणी त्यांच्या जीवनाचा धोका वाढत जातो.

भारत सरकारने सुरु केली जनजागृती मोहीम 

भारत सरकारला देशात उच्च रक्तदाब दर 30 ते 25 टक्क्यांपर्यंत खाली आणायचा आहे. यासाठी 2025 पर्यंत लक्ष्य ठेवले आहे. यासाठी येत्या चार वर्षांत या आजाराने ग्रासलेल्या साडेचार कोटी लोकांच्या चांगल्या उपचारासाठी सरकारला व्यवस्था अधिक तीव्र करावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, जगातील बहुतेक मृत्यूंमध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग Cardiovascular disease (CVD)सर्वात मोठे योगदान आहे.