बाबा रामदेव यांनी सांगितले ब्लड प्रेशरवर घरगुती उपाय, अवघ्या 10 रुपयात होईल कंट्रोल

How To Reduce High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर अतिशय घातक आजार आहे. या आजारामुळे असंख्य समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमचा बीपी 120/80 हून अधिक असेल तर हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील जे बाबा रामदेव यांनी सांगितले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Mar 16, 2024, 01:10 PM IST
बाबा रामदेव यांनी सांगितले ब्लड प्रेशरवर घरगुती उपाय, अवघ्या 10 रुपयात होईल कंट्रोल  title=

जगात सर्वाधिक मृत्यू हृदयविकारामुळे होतात. त्यांचे मुख्य कारण म्हणजे बीपी रोग ज्याला उच्च रक्तदाब म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 30 ते 79 वयोगटातील सुमारे 1.28 अब्ज लोक या आजाराचे बळी आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की उच्च रक्तदाब तुमच्या मेंदूसाठीही धोकादायक आहे. हा उच्च रक्तदाब तुमच्या आयुष्यासाठी जीवघेणा ठरु शकतो. अशावेळी घरगुती उपाय महत्त्वाचे ठरतात. योगगुरु रामदेव बाबा यांनी सांगितले उत्तम पर्याय. 

मेंदूतील रक्तदाब वाढल्याची लक्षणे : उच्च रक्तदाबामुळे मेंदूच्या नसांना इजा होऊ शकते. ज्यामुळे स्ट्रोक होतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिनी फुटल्यामुळे रुग्णाला गोंधळ होतो, बघायला आणि बोलण्यात अडचण येते, शरीर आणि चेहऱ्याच्या एका बाजूला बधीरपणा येतो, चालायला त्रास होतो आणि तीव्र डोकेदुखी होते. बाबा रामदेव यांनी 4 पदार्थांबद्दल सांगितले जे बीपी नॉर्मल करतात.

बाबा रामदेव यांचे उपाय 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swami Ramdev (@swaamiramdev)

 

खजूर 

रक्तदाब सामान्य करण्यासाठी खजूर खावे. सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असल्याने त्यांचा आहारात समावेश केल्यास उच्च रक्तदाबापासून आराम मिळतो. हे गोड अन्न कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि मँगनीजचे स्त्रोत देखील आहे.

(हे पण वाचा - Ramadan 2024 : रमजानच्या दिवसात खजूर खाऊनच का सोडतात रोजा? 8 आरोग्यदायी फायदे) 

दालचीनी 

दालचिनी घेतल्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब सामान्य होतो. हृदयरोगींसाठी ही औषधी वनस्पती खूप फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमच्या मज्जातंतूंना आराम मिळतो आणि ब्लॉकेजचा धोका झपाट्याने कमी होतो.

मनुके

मनुका मध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे रक्त धमन्या निरोगी होतात. अँटिऑक्सिडंट्सच्या मदतीने हा ड्राय फ्रूट उच्च रक्तदाब नियंत्रित करू शकतो. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.

गाजर 

गाजर हे  असे सलाड आहे जे रक्तदाब नियंत्रित करते. विविध संशोधनांमध्ये, हे खाल्ल्यानंतर बीपी पातळी सामान्य झाल्याचे दिसून आले आहे. यामागे फायबर आणि पोटॅशियमची भूमिका दिसून आली आहे. त्याचा ज्यूस पिऊनही तुम्हाला हा फायदा मिळू शकतो.

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x