Bad Body Odour: घामाच्या दुर्गंधीने त्रासलात? अंघोळीच्या पाण्यात 'या' 3 गोष्टींचा वापरल्यास दूर होईल समस्या

Summer Bathing Tips: उन्हाळ्यामध्ये उष्णतेबरोबरच त्रास होतो तो घामाचा. घामामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र घामामुळे शरीराला येणाऱ्या दुर्गंधीने अनेकदा चारचौघांमध्ये नाचक्की होते. पण या घामाच्या दुर्गंधीवर घरच्या घरी प्रभावी उपाय करणं शक्य आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 13, 2023, 04:32 PM IST
Bad Body Odour: घामाच्या दुर्गंधीने त्रासलात? अंघोळीच्या पाण्यात 'या' 3 गोष्टींचा वापरल्यास दूर होईल समस्या title=
Bad Body Odour

Bad Body Odour: सध्या देशभरामध्ये उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. महाराष्ट्रातील काही ठिकाणी तर पुढील काही दिवसांमध्ये अती उष्णता असेल असा इशारा देण्यात आला आहे. घाम, सतत लागणारी तहान, उन्हाच्या झळा यामुळे अनेकांना घराबाहेरही पडावसं वाटत नाही. मात्र काही कारणानिमित्त घराबाहेर पडलेच तर घरी आल्याआल्या आधी अंघोळीला जाणारेही अनेकजण आहेत. उन्हाळ्यामध्ये बाहेरुन घरी आल्यानंतर अंघोळ केल्याने त्रास आणि क्षीण कमी होतो मात्र त्याचबरोबर शरीरावर घामामुळे जमा झालेले बॅक्टेरियाही नष्ट करतो. मात्र असं असलं तरी बाहेर असताना एक गोष्ट अनेकांना सतावते, ती म्हणजे घामामुळे शरीराला येणारी दुर्गंधी. अनेकदा चारचौघांमध्ये असतानाच घामाच्या वासामुळे अवघडल्यासारखं होतं.

घामाच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही इलाज किंवा घरगुती उपाय आहेत का याबद्दल अगदी इंटरनेटवरही अनेकजण सर्च करतात. मात्र आता तुम्हाला हे करण्याचा गरज नाही कारण आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत काही घरगुती उपाय ज्याच्यामुळे तुमच्या या समस्येचं नक्कीच निराकरण होईल. घरगुती वापरातील गोष्टींमध्ये काही अशा गोष्टी आहेत ज्या नैसर्गिकपणे अॅण्टी बॅक्टेरियल असतात. म्हणजेच या वस्तू बॅक्टेरियाचा नाश करण्यासाठी फायद्याच्या ठरतात. या गोष्टी पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास फार फायदा होतो. या गोष्टी शरीराची पीएच लेव्हल समतोल ठेवण्यास मदत करतात. तसेच या गोष्टी खाज आणि घामाच्या समस्येवरही रामबाण उपाय ठरतात. या गोष्टी अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्यास संपूर्ण दिवस फ्रेश वाटतं. आता या गोष्टी नेमक्या कोणत्या जे पाहूयात...

कडूलिंब

कडूलिंबाचा वापर हा बॅक्टेरियांवरील रामबाण उपायांपैकी एक नैसर्गिक उपाय म्हणून अनेक जागी सुचवला जातो. कडूलिंबाच्या वापरामुळे त्वेचं बॅक्टेरियापासून संरक्षण होतं. अंघोळीच्या पाण्यामध्ये कडूलिंबाची पानं किंवा तेल टाकून अंघोळ केली तर त्वचा कोरडी पडणे, त्वचा सुकणे, घामामुळे येणारी दुर्गंध आणि खाज यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते.

हळद

हळदीमधील बॅक्टेरियाविरोधी तत्व फारच प्रभावी आहेत. हळदीमध्ये त्वचा तजेलदार ठेवण्याचे गुणधर्म असल्याने अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालून अंघोळ करणं फायद्याचं असतं. त्वचा तजेदार बनवण्याबरोबरच यामुळे स्क्रीन टोन सुधरण्यासही मदत होते.

गुलाबाच्या पाकळ्या...

अंघोळ करण्याच्या काही वेळ आधी अंघोळीच्या पाण्यात गुलाबाच्या पाळ्या टाकून ठेवाव्यात. त्यानंतर त्याच पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा तजेलदार होण्यास आणि घामामुळे येणारी दुर्गंधी पळवून लावण्यास मदत होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)