ब्लीचमुळे होणारी जळजळ दूर करण्याचे ५ सोपे उपाय!

पार्टीत किंवा एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे असल्यास चेहरा झटपट चमकदार दिसण्यासाठी ब्लीचचा पर्याय निवडला जातो. 

Updated: May 4, 2018, 08:00 AM IST
ब्लीचमुळे होणारी जळजळ दूर करण्याचे ५ सोपे उपाय!

मुंबई : पार्टीत किंवा एखाद्या खास कार्यक्रमाला जायचे असल्यास चेहरा झटपट चमकदार दिसण्यासाठी ब्लीचचा पर्याय निवडला जातो. ब्लीचमुळे चेहऱ्याचे टॅन निघून जाते व चेहरा उजळ, चमकदार दिसतो. मात्र ब्लीचमध्ये अनेक केमिकल्स असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील लव गोल्डन होते आणि काळवंडलेला चेहरा चमकू लागतो. मात्र ब्लीचच्या वापरामुळे काहींना जळजळ होते. ही जळजळ फार त्रासदायक, असह्य होते. मग त्यावर उपाय काय? तर हे घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर ठरतील. त्यामुळे ब्लीच केल्यानंतर जळजळ होत असल्यास या टिप्स फॉलो करा. त्यामुळे जळजळीचा त्रास दूर होईल आणि तुमचे सौंदर्यही टिकून राहील. 

कोरफड

कोरफडीत अँटीसेप्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे ब्लीचनंतर होणारी जळजळ कमी करण्यासाठी कोरफड जेल लावून चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने मसाज करा. अर्ध्या तासाने जेल सुकल्यावर चेहरा पाण्याने धुवा. असे २-३ वेळा केल्यास जळजळ कमी होण्यास मदत होईल.

खोबरेल तेल

खोबरेल तेलात अॅँटीसेप्टीक गुणधर्म असतात. त्यामुळे जळजळीपासून पटकन आराम मिळतो. 

बर्फ

ब्लीचनंतर होणारी जळजळ थांबवण्यासाठी चेहऱ्यावर थंड पाणी मारा किंवा बर्फाचा तुकडा फिरवा. त्यामुळे खूप आराम मिळेल.

बटाट्याची साल

बटाट्याच्या सालीत हिलींग (त्रास बरा करण्याचे) गुणधर्म असतात. जळजळ होत असलेल्या जागी बटाट्याची साल लावा. काही वेळ ती तशीच ठेवा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. दिवसातून दोनदा असे केल्याने त्वचेची जळजळ कमी होईल.

चंदन पावडर

चंदन हे नैसर्गिकरीत्या थंड असतं. त्यामुळे चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी घालून चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहऱ्याला थंडावा मिळेल आणि जळजळ दूर होईल.