Belly Fat Mistakes: आजकाल अनेकांची समस्या असते ती म्हणजे सुटलेलं पोट (Belly Fat)... बेली फॅटची समस्या आजकाल तरूण वयातील व्यक्तींना देखील सतावते. तासनतास जीममध्ये (Gym) वेळ घालवणं, योग्य ते डाएट फॉलो (Diet) करून देखील काहीवेळा बेली फॅट (Belly Fat) कमी होताना दिसत नाही. पण असं का होतंय, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? डाएट आणि जीम करून देखील वजन का कमी होत नाहीये, याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सुटलेलं पोट कमी करण्यासाठी तुम्ही दररोज जीममध्ये तासनतास वेळ घालवत असाल किंवा योग्य पद्धतीने डाएट करताय. मात्र तरीही पोट कमी होत नसेल तर त्यामागे ही कारणं असू शकतात.
वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरातील अतिरीक्त फॅट्स (Extra Fats) कमी करण्यासाठी कॅलरीजची भूमिका फार मोलाची असते. वजन कमी करायचं असेल तर कॅलरीजच्या मात्रेवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे अशावेळी डाएट चार्टमध्ये तुम्ही घेत असलेल्या आहाराच्या कॅलरीजचं मोजमाप केलं पाहिजे. जेणेकरून तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे.
निरोगी राहण्यासाठी व्यक्तीला दररोज 7-8 तासांची झोप घेणं फार गरजेचं आहे. यासोबत जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर झोपेच्या शेड्यूलवर लक्ष दिलं गेलं पाहिजे. जर तुम्ही रात्री उशीरा झोपत असाल किंवा सकाळी उशीरापर्यंत झोपत असाल तर तुमचं वजन वाढू शकतं. त्यामुळे बेली फॅट कमी करायचं असेल तर पुरेशी आणि योग्य वेळेत झोप घेणं गरजेचं आहे.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी बराच वेळ वर्कआऊट करत असाल आणि त्यानंतर घेणाऱ्या आहाराकडे फारसं लक्ष देत नसला तर हे तुमच्यासाठी योग्य नाही. वर्कआऊटनंतर तुम्ही हाय कॅलरीज डाएट घेणं टाळणं पाहिजे. शक्यतो वर्कआऊट केल्यानंतर कमी खाल्लं पाहिजे.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे व्यायाम करताय का हे जाणून घेतलं पाहिजे. जास्त प्रमाणात कार्डियो केल्याने शरीराची डेंसिटी वाढते. दरम्यान याचा परिणाम मेटाबॉलिक प्रकियेवर होऊ शकतो. त्यामुळे वजन कमी करताना वेट लिफ्टवर लक्ष दिलं पाहिजे.