close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वेलची आरोग्यासाठी गुणकरी, वाचा रोज वेलची खाल्ल्याचे फायदे

वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे.

Updated: Apr 18, 2019, 07:50 PM IST
वेलची आरोग्यासाठी गुणकरी, वाचा रोज वेलची खाल्ल्याचे फायदे

मुंबई : वेलची एक सुगंधी मसाला आहे. वेलचा स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग गोड पदार्थात चव वाढविण्यासाठी करण्यात येता. तसेच वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत.

वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असेही म्हणतात. जेवणानंतर अनेक लोक वेलची माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. असे असले तरी वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते.

- तीन वेलची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते.

- वेलचीमध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एक वेलची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या.

- अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.

- वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते.

- खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात वेलची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.