Bikini Waxing: प्रेग्नन्सीमध्ये बिकिनी वॅक्सिंग करणं योग्य की अयोग्य?

गरोदरपणात प्यूबिक हेअर स्वच्छ करणे कठीण असतं, मात्र पण अशा स्थितीत बिकिनी वॅक्सिंग किती सुरक्षित आहे? जाणून घेऊयात 

Updated: Sep 12, 2022, 11:46 PM IST
Bikini Waxing: प्रेग्नन्सीमध्ये बिकिनी वॅक्सिंग करणं योग्य की अयोग्य? title=

Bikini Waxing in Pregnancy: प्रेग्नन्ट महिलांमध्ये शरीरावरील केसाची वाढ अधिक वेगाने होते हे तुम्हाला ठाऊक आहे का? प्रेग्नन्सीमध्ये शरीरातील ऍस्ट्रोजन हार्मोनमधील इम्बॅलन्समुळे (estrogen in pregnancy) असं होऊ शकतं. महिला त्यांच्या या पब्लिक हेअरबाबत अत्यंत संवेदनशील असतात, प्रेग्नन्सीमध्ये नेहमीच प्यूबिक हेअर ( pregnancy and pubic hair growth ) काढणं कठीण होतं. अशात अनेक महिला प्रेग्नन्सीमध्ये थेट बिकिनी वॅक्सिंग सारखा उपाय अवलंबतात. मात्र हे बिकिनी वॅक्सिंग सेफ आहे का?( Is Bikini Waxing Safe) जाणून घेऊयात.

खरंतर बिकिनी वॅक्सिंगचे अनेक फायदे आणि सोबतच तोटे देखील आहेत.

प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिंग करणं योग्य की अयोग्य :

कोणत्याही गर्भवती महिलेला अंडरआर्म्स, पोट किंवा अगदी पायांवरून केस काढणे सोपे जाते. मात्र बेबी बम्पमुळे पोटाखालील व्हजायनल भागातील केस काढणं अत्यंत कठीण होतं. अशात अनेक महिला या बिकिनी वॅक्सिंगचा पर्याय अवलंबतात. खरंतर डॉक्टरांच्या माहितीनीसार गर्भावस्थेत व्हजायनल इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी पब्लिक हेअर काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अशात बिकिनी वॅक्सिंग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. याने त्या महिलेला  पुढे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत आधीच माहिती मिळू शकते. याने महिलांना व्हजायनल भागात खाज येणं, सूज येणं किंवा युरीन पास करताना जळजळ होऊ शकते. 

प्रेग्नन्सीमध्ये बिकिनी वॅक्सिंगचे फायदे : 

  • बिकिनी वॅक्सिंगमुळे व्हजायनल भाग स्वच्छ राहण्यास मदत होते, याने इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.
  • गर्भावस्थेत हार्मोनल संतुलन बिघडल्याने प्यूबिक हेअर ग्रोथ वेगाने होते. अशात बिकिनी वॅक्सिंगमुळे प्यूबिक हेअर ग्रोथ कमी करणं फायद्याचं ठरतं. 
  • यामुळे महिलांच्या व्हजायनल भागातील रॅशेस कमी होतात 
  • यामुळे महिला डिलिव्हरीसाठी तयार राहतात
  • रेझर किंवा केस काढण्याच्या क्रीमपेक्षा वॅक्सिंग दीर्घकालीन फायद्याचं ठरतं

प्रेग्नन्सीमध्ये बिकिनी वॅक्सिंगचे तोटे : 

  • प्रेग्नन्सीमध्ये महिलांचा व्हजायनल भाग आधीच अतिशय संवेदनशील झालेला असतो. अशात बिकिनी वॅक्सिंग अत्यंत वेदनादायी ठरू शकतं 
  • काही महिलांना बिकिनी वॅक्सिंगनंतर रॅशेस येऊ शकतात 
  • योग्य काळजी न घेतल्यास गरम वॅक्समुळे त्वचेला चाकात बसू शकतो किंवा भाजलं जाऊ शकतं. यामुळे त्वचेचा PH बॅलन्स बिघडू शकतो 
  • खालच्या अंगाची त्वचा अतिशय संवेदनशील असते, वॅक्सिंग करताना अनेकदा कट लागण्याची शक्यता असते. अशात या त्वचेवर फोडी येऊन पस देखील होऊ शकतो. 
  • रफ स्किनमुळे त्वचे संबंधित इन्फेक्शन होऊ शकतं. अशात महिलांना अतिरिक्त अँटिबायोटिक्स घ्याव्या लागू शकतात.

खरंतर, प्रेग्नन्सीमध्ये बिकिनी वॅक्सिंग करणं सुरक्षित मानलं जातं, मात्र शेवटच्या दोन महिन्यांमध्ये असं करणं योग्य नसल्याचं डॉक्टर सांगतात. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि देखरेखीत बिकिनी वॅक्सिंग करावं.

bikini waxing in pregnancy safe or not know all pros and cons as per doctors guidance