मुंबई : सेक्सनंतर अनेकदा महिलांना प्रेगनन्सीची चिंत भासते. प्रेगनन्सी थांबवण्यासाठी अनेक वैद्यकीय पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पुरूष यासाठी कंडोमचा वापर करतात. तर महिला गर्भनिरोधक गोळ्याचा वापर करतात. विचार करा जर अशी गर्भनिरोधक गोळी पुरूषांसाठी असली तर... वैज्ञानिक अशाच एका गोळीवर संशोधन करीत आहे. जी पुरूषांच्या वीर्यावर परिणाम करून प्रेगनन्सीच्या चिंतेपासून मुक्त करू शकेल. पुरूषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांबाबत जाणून घेऊ.
सेक्सदरम्यान बर्थ कंट्रोल करण्यासाठी आतापर्यंत मर्यादीत पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात जास्त कंडोमचा व गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो. गोळ्याचा जास्त वापर केल्याने साइड इफेक्टदेखील दिसून येतात. ज्यामुळे गर्भनिरोधक गोळ्या महिलांसाठी नेहमी चिंतेचा विषय ठरला आहे.
परंतू आता वैज्ञानिक पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्यांवर संशोधन करीत आहेत. या गोळ्याचा उंदरांवरील प्रयोग 99 टक्के परिणामकारक ठरला आहे. या गोळ्यांचा कोणताही दुष्परिणाम अद्याप दिसून आलेला नाही.
एंजलिस बायोमेडिकल रिसर्च इंस्टिट्यूट ऍंड युनिवर्सिटी ऑफ वाशिंग्टनच्या वैज्ञानिकांनी दावा केला की, ही गोळी प्रेगनन्सी रोखण्यासाठी परिणामकारक ठरली आहे. ही गोळी पुरूषांमधील वीर्य रोखण्यास मदत करेल. ज्यामुळे लैंगिक संबधांनंतर महिला जोडीदार प्रेगनन्ट राहण्याशी शक्यता 99% कमी होईल. या गोळ्यांवर पुढील संशोधन सुरू आहे.