'या' कारणामुळे हृदयात होतायत blood clots; शरीरात दिसून येतील 'ही' लक्षणं

हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याला काही वेगळी कारणं असू शकतात. 

Updated: Oct 30, 2022, 04:59 PM IST
'या' कारणामुळे हृदयात होतायत blood clots; शरीरात दिसून येतील 'ही' लक्षणं title=

मुंबई : सामान्यपणे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची तक्रार अनेकांना पायांच्या नसांमध्ये जाणवते. पण तुम्हाला माहिती आहे का की, हृदयातंही रक्ताच्या गाठी होऊ शकतात. हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याला काही वेगळी कारणं असू शकतात. हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याची स्थिती अत्यंत दुर्मिळ असली तरी फार कमी लोकांमध्ये दिसून येते. 

हृदयामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या की यामध्ये रक्तप्रवाह थांबतो. परिणामी या परिस्थितीमुळे रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यासारख्या जीवघेण्या स्थितीला सामोरं जावं लागू शकतो. हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याने रुग्णाच्या शरीरातील रक्ताभिसरणही बंद होतं. जर हा त्रास तीव्र प्रमाणात असेल तर रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

हृदयात रक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणं

  • सतत बसून काम करणं
  • अधिक प्रमाणातील धुम्रपान
  • हृदयाशी संबंधित आजार
  • शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन
  • वेरिकोज व्हेन्स

हृदयात रक्ताच्या गुठळ्या झाल्याची लक्षणं

  • छाती दुखणं
  • श्वास घेण्यामध्ये अडचण
  • हात, पाठ आणि मान दुखणं
  • हृदयविकाराचा झटका
  • अचानक चक्कर येणं
  • चालताना अडखळणं
  • कोणत्याही कारणाशिवाय तीव्र डोकेदुखी

हृदयात रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची लक्षणं दिसून आल्यानंतर त्वरित उपचार करणं आवश्यक आहे. तपासणीनंतर रुग्णाची स्थिती पाहून डॉक्टर या समस्येवर उपचार करतात. प्राथमिक टप्प्यात, तुमच्या रक्तातील प्लेटलेट्स आणि रक्ताची तपासणी केली जाते. यानंतर काही औषधांनीही ही समस्या दूर होऊ शकते. जर ही समस्या गंभीर असेल तर शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x