कँडललाईट डिनर आरोग्यासाठी धोक्याचं, अहवालातून आलं समोर

 साऊथ कॅरिलोना स्टेट युनिव्हर्सिटीचा निष्कर्ष

Updated: Dec 17, 2019, 10:54 PM IST
कँडललाईट डिनर आरोग्यासाठी धोक्याचं, अहवालातून आलं समोर title=

मुंबई : कँडल लाईट डिनर या पाश्चात्य कल्पनेनं भारतातही मूळ धरलंय. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत कँडल लाईट डिनर करावं असं प्रत्येकाला वाटतं. पण हे कँडललाईट डिनर आरोग्यासाठी धोक्याचं असल्याचं एका पाहणी अहवालातून समोर आलं आहे. आवडत्या व्यक्तीसोबत कँडल लाईट डिनर करायला कुणाला आवडत नाही. कँडललाईट डिनरसाठी काही लोकं हजारो रुपये मोजतात. कँडल लाईट डिनरचे क्षण खास असेच असतात. पण हेच कँडल लाईट डिनर आरोग्यासाठी घातक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. 

कँडललाईट डिनर धोकादायक व्हायला कारणीभूत आहे मेणबत्तीचा धूर. मेणबत्तीतून निघणारा धूर हा सिगारेटच्या धुरापेक्षाही धोकादायक असल्याचा निष्कर्ष साऊथ कॅरिलोना स्टेट युनिव्हर्सिटीनं काढला आहे. मेणबत्तीत पॅराफिन आणि अनेक घातक घटक असल्याचं डॉक्टर सांगतात.

मेणबत्तीचा हा धूर एवढा घातक आहे की त्यामुळं फुफ्फुसांना हानी पोहचते. शिवाय कॅन्सरसारखा गंभीर आजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता तुम्ही कितीवेळ मेणबत्तीच्या धुराच्या संपर्कात राहता यावरही आजार होणं अवलंबून आहे. कँडललाईट डिनरचे धोके लक्षात घेऊन कधीतरी एकदा कँडललाईट डिनर करायला हरकत नाही. पण यापासून स्वत:ची काळजी घेणं देखीत तितकंच महत्त्वाचं आहे.