डबल्यु.एच.ओ ने ए.ई.एस बद्दल सांगितले.
डबल्यु.एच.ओ ने सांगितल्याप्रमाणे,भारतात चांदीपुरा व्हायरस (सी.एच.पी.वी) पसरत चालला आहे.जागतिक आरोग्य संस्थेने जूनपासुन 15 ऑगस्टपर्यंत आरोग्य विभागाने 245 अँक्युट एन्सेफलायटीस सिंड्रोम (ए.ई.एस) च्या 245 रुग्णांची नोंद केली आहे, त्यातील 82 जणांचा मृत्यू झाला असुन एकूण रुग्णांपैकी 64 रुग्णांना चांदीपुरा व्हायरसचाच संसर्ग झाला होता.आत्तापर्यंत भारतातल्या 43 जिल्ह्यांमधे ए.ई.एस च्या संसर्गाची लागण झाली आहे.
गेल्या 20 वर्षांपेक्षा जास्त फैलाव.
सी.एच.पी.वी भारतातला स्थानिक संसर्ग असून सातत्याने त्याची लागण होत असते. पण गेल्या 20 वर्षांपेक्षा यंदा जास्त फैलाव होत असल्याचे डबल्यु.एच.ओने सांगितले. सी.एच.पी.वी हा 'राबडोवेरीडी'(Rhabdoviridae) च्या गटातील संसर्ग आहे. ए.ई.एस पश्चिम,मध्य आणि दक्षिण भारतात जास्त करुन पावसाळ्यात पसरतो. विशेष करुन गुजरातमध्ये दर 4-5 वर्षांनी पसरतोच.
जुलैपासून रुग्णसंख्येत घट.
रोगमुक्तीचा दर वाढु शकतो मात्र आधी योग्य उपचारांचा शोध लावायला हवा आणि रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. असे डबल्यु.एच.ओने सांगितले. 19 जुलैपासून ए.ई.एस.च्या रुग्णांची संख्या कमी होत आहे.सी.एच.पी.वी ची लागण डास,माश्या,चिलटे आदींमुळे होते. रोगाची तीव्रता वाढत जात असुन रोगावर निश्चित असा उपचार अजून मिळालेला नाही.
संसर्ग वाढण्याची शक्यता.
2003 ला आंध्र प्रदेशमध्ये 329 लोकांना सी.एच.पी.वी लागण झाली असल्याची शक्यता वर्तवली गेलेली. 329 पैकी 183 जणांचा मृत्यू झाला होता. येत्या काही महिन्यांत सी.एच.पी.वी चा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. रोगसंसर्ग थांबवण्यासाठी वैद्यकीय शाखा कार्यरत आहेत.डास-माश्यांपासुन संरक्षण देण्याचा प्रयत्न चालु आहे.
महामारीपर्यंत प्रकरण जाऊ नये.
डबल्यु.एच.ओने पुढे म्हटले, केंद्रीय आरोग्य मंत्रालयने राष्ट्रीय संयुक्त रोग प्रतिकार संघ (NJORT) गुजरातमध्ये कार्यरत केला गेला आहे. आणि महामारीपर्यंत प्रकरण जाऊ नये म्हणून आरोग्य मंत्रालय प्रयत्न करत आहे.गुजरात जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र इतर व्हायरसांवर देखील संशोधन करत आहे.
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.