सावधान, लहान मुलांमध्ये तेजीनं फैलावतोय ब्रेन ट्युमर!

 इंडियन मेडिकल असोसिएशन (आईएमए) च्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी ४०,००० ते ५०,००० लोकांमध्ये ब्रेन टयूमर आढळतो. 

Updated: Jul 27, 2017, 02:56 PM IST
सावधान, लहान मुलांमध्ये तेजीनं फैलावतोय ब्रेन ट्युमर! title=

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशन (आईएमए) च्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी ४०,००० ते ५०,००० लोकांमध्ये ब्रेन टयूमर आढळतो. यामध्ये २०% मुलांचा समावेश असतो. चिंताजनक बाब म्हणजे, गेल्या वर्षी हा आकडा केवळ ५ टक्क्यांवर होता. तसेच, भारतात २५,०० मुलांमध्ये हा मेडुलोब्लास्टोमा रोग आढळतो.

९० % आजार बरा होतो

आईएमएच्या म्हणण्यानुसार, मेडुलोब्लास्टोमा हा मुलांमध्ये आढळला जाणारा एक घातक असा प्राथमिक ब्रेन ट्यूमर आहे. मेंदू व मज्जारज्जू द्रवपदार्थ (सीएसएफ) च्या माध्यमातून तो पसरतो.  त्यामुळे पाठीचा कणा आणि मेंदू, इतर शरीरावर त्याचा परिणाम दिसू लागतो. जर उपचार प्रक्रिया योग्य असेल तर, जवळ - जवळ ९०% लोकांचा आजार हा बरा होऊ शकतो. संशोधनानुसार, ब्रेन ट्यूमर ल्यूकेमियानंतर मुलांमध्ये हा दुसरा सामान्य कर्करोग आढळला आहे.

समस्या 

आईएमएचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवालच्या मते, मेंदूचा आजार ही गंभीर समस्या आहे ती कोणत्याही वयात होऊ शकते. यामध्ये विचार करणे, बघणे आणि बोलण्याची समस्या उद्भवू शकते. ब्रेन टयूमरचा हा भाग अनुवांशिक विकाराशी निगडीत आहे. काही लोकांना हा टॉक्सिक पदार्थ तसंच मोबाईलच्या रेडिएशनमुळेही होऊ शकतो. 

लक्षणे

डॉ. अग्रवाल यांच्या मते, टयूमर ब्रेन स्टेम किंवा शरीरातील अन्य भागात असेल तर कदाचित शस्त्रक्रिया करणं धोकादायक ठरू शकतं. ज्यांना शस्त्रक्रिया करणे शक्य नसेल तर त्यांना रेडिएशन थेरपी किंवा इतर उपचार मिळू शकतात. यामध्ये उलटी होणे आणि सकाळी उठल्यावर डोके दुखणे ही लक्षणे त्या व्यक्तींमध्ये आढतात. डॉक्टर अनेकदा याला जठराचे रोग किंवा माइग्रेन समजून उपचार करतात. मेडुलोब्लास्टोमा रोगापासून पीडित मुलं अनेकदा अडखळतात आणि खाली पडतात. त्यांना लकवा ही मारू शकतो, तर चक्कर येणे, चेहरा सुन्न पडणे किंवा अशक्तपणा ही लक्षणंही त्यांच्यात दिसू शकतात.

या गोष्टींवर लक्ष दया

डॉ. के. के. अग्रवाल यांच्या मते, मेडुलोब्लास्टोमापासून पीडित मुलांसाठी फक्त औषधचं उपयोगी नाहीत तर टयूमर परत उद्भवला तर नाही ना किंवा कुठला दुष्प्रभाव तर नाही हे निश्चित करणं गरजेचं आहे. तसंच मुलांच्या सर्वांगीण आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वाधिक मुलांमध्ये या रोगावर उपचार केल्यानंतर कायम डॉक्टरांच्या संपर्कात राहणे आवश्यक आहे.

सूचना

- रसायने आणि कीटकनाशकांपासून लांब राहा. हे गर्भवतीसाठी विशेष महत्त्वाचे आहे.

- फळे आणि भाज्या खा आणि नियमित व्यायाम करा

- धुम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा