Cholesterol ला एका झटक्यात कमी करायचं? आहारात 'या' तेलाचा समावेश करा...

 Cholesterol : कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार आहेत. यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल असे प्रकार असतात.  खराब कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Updated: Jun 7, 2023, 03:25 PM IST
Cholesterol ला एका झटक्यात कमी करायचं? आहारात 'या' तेलाचा समावेश करा... title=
oils to eat in high Cholesterol

Bad Cholesterol : चुकीचे खाणे, धूम्रपान, दारू पिणे आणि सॅच्युरेटेड फॅट यामुळे कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol) प्रमाण वाढत असते. दुग्धजन्य पदार्थ, पॅकेज केलेले पदार्थ, मांस, केक आणि पेस्ट्री यांसारख्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आढळतात. या गोष्टींचे जास्त सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वाढते. डॉक्टरांच्या मते, निरोगी व्यक्तीच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची सरासरी पातळी 200 mg/dl पेक्षा कमी असली पाहिजे, जर हे प्रमाण ओलांडले तर हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. यासाठी खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्यावे. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढण्याची चिंता वाटत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा आहारात या तेलांचा समावेश करा...

कोलेस्टेरॉल कसे कमी करावे?

कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रित करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे योग्य आहार घेणे आणि दररोज शारीरिक व्यायाम करणे. उदाहरणार्थ योग, धावणे, पोहणे इत्यादी व्यायाम करू शकता. शरीराची नियमित काळजी घेणे खूप गरजेचे आहे. 

तसेच अन्नामध्ये वापरण्यात येणारे तेल खराब कोलेस्टेरॉलसाठी देखील एक घटक मानले जाते. खाद्यतेलामध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅट्समुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. उदाहरणार्थ, खोबरेल तेल, पाम तेलामध्ये आढळणारे सॅच्युरेटेड फॅट्स खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढवू शकतात. अशा परिस्थितीत ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांनी आरोग्यदायी तेलाचा पर्याय शोधला पाहिजे. अशा पाच तेलांबद्दल जाणून घ्या, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत…  

शेंगदाणाचे तेल

शेंगदाणाचे तेल हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जेवणामध्ये शेंगदाणा तेलाचा वापर केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल कमी न होता वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. शेंगदाणा तेल ग्रीलिंगसाठी, भाज्या तळण्यासाठी आणि मांस तळण्यासाठी योग्य आहे.

तिळाचे तेल

तिळाचे तेल कोलेस्ट्रॉल मुक्त असते. त्यात संतुलित प्रमाणात चांगले चरबी असते. याच्या प्रत्येक एका चमच्यामध्ये 5 ग्रॅमपेक्षा जास्त मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, 2 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट असते. तिळाचे तेल भाजी बनवण्यासाठी वापरता येऊ शकते.

ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह ऑइलमध्ये कोलेस्टेरॉल नसते. हे पौष्टिक असून त्यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते. ऑलिव्ह ऑइलचा वापर सॅलड्स किंवा पास्तासाठी टॉपिंग म्हणून केला जातो.

चिया बियांचे तेल

चिया सीड ऑइलमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ते तळण्यासाठी, पास्ता आणि सॅलडसाठी चांगले आहेत. चिया बियांमध्येही भरपूर फायबर असते.

एवोकॅडो तेल

एवोकॅडो तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे तेल मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचा चांगला स्रोत आहे. कोलेस्ट्रॉलमध्ये या तेलाचे सेवन करणे चांगले.

 

 

 

( Disclaimer : वर देण्यात आलेल्या गोष्टी केवळ सामान्य माहिती प्रदान करतात. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या गोष्टींची पुष्टी करत नाही. )