World Food Safety Day : नेहमीच बाहेरचं खाताय? 'या' पदार्थांमधून होऊ शकते विषबाधा, वेळीच सावध व्हा!

World Food Safety Day 2023 : शरीर निरोगी ठेवण्यासाठी अन्नाची भूमिका सर्वात महत्वाची असते. पण लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि गरजा लक्षात घेऊन अनेक गोष्टी बनवण्याच्या आणि वाढवण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. म्हणूनच दूषित अन्न आणि पाण्याच्या हानीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न दिन (World Food Safety Day) साजरा केला जातो.

श्वेता चव्हाण | Updated: Jun 7, 2023, 09:59 AM IST
World Food Safety Day : नेहमीच बाहेरचं खाताय? 'या' पदार्थांमधून होऊ शकते विषबाधा, वेळीच सावध व्हा!          title=
World Food Safety Day 2023

World Food Safety Day 2023 News In Marathi :  अन्न हे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. हे आपल्या शरीराचे इंधन आहे त्यामुळेच आपण सर्व कामे करू शकतो. शरीरासाठी जितके जास्त अन्न आवश्यक आहे, तितके अधिक पौष्टिक आणि स्वच्छ पद्धतीने घेणे आवश्यक आहे. निरोगी आणि पौष्टिक आहार तुम्हाला उत्साहाने आणि चांगले काम करण्यास मदत करतो. दुसरीकडे, न शिजवलेल्या अन्नामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका निर्माण होतो.

दरम्यान जागतिक अन्न सुरक्षा दिवस (World Food Safety Day 2023) हा दरवर्षी 7 जून रोजी अन्न मानकांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. हा दिवस लोकांना निरोगी आणि स्वच्छ आहाराबद्दल जागरुक करतो, जेणेकरून तुम्ही जे खात आहात ते सुरक्षित आहे आणि तुम्ही आजारी पडणार नाही. पोटाच्या अनेक आजारांमागे अन्नपदार्थाची स्थिती असते आणि ते दूषित होण्याचे मुख्य कारण मानले जाऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच कॉलरा, टायफॉइड, अतिसार आणि अन्न विषबाधा यासारख्या आरोग्य समस्या ही उदाहरणे आहेत. निरोगी आणि सुरक्षित अन्नासाठी कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे? जाणून घेऊया... 

वाचा : तुम्ही खाताय त्या चिप्स, सॅलडमधील मीठच तुमच्या आरोग्याचा शत्रू; पाहा Special Report

बहुतेक लोक अशा पदार्थांचे सेवन करतात, जे चवीला चांगले असतात, परंतु त्यांच्या सेवनाने गंभीर आजारांचा धोका असतो. असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन पोटासाठी खूप हानिकारक असू शकते. त्यामुळे शरीरात विष तयार होऊ शकते. 

गोडाचे प्रकार

प्रत्येकजण साखर माफक प्रमाणात खावी. साखरेच्या अतिसेवनामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होते. तसेच, पोटावर नकारात्मक परिणाम होतील. चांगले बॅक्टेरिया आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. साखर चांगले बॅक्टेरिया मारते. त्यामुळे शरीरात जळजळ होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.  

तळलेले पदार्थ

तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाणे बंद करा. जास्त तेल खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. पोटाची चरबी फक्त या प्रकारच्या अन्नामुळे वाढते. तळलेले पदार्थ जसे पकोडे, कचोरी इत्यादी खाणे टाळावे. जेणेकरुन तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत करेल.

अल्कोहोल

अल्कोहोलचे सेवन यकृतासाठी तसेच पोटासाठी हानिकारक आहे. अल्कोहोलचे सेवन केल्याने पोटाचा त्रास देखील होऊ शकतो आणि त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. 

जागतिक अन्न सुरक्षा दिन 2023 चे महत्त्व

टायफॉइड हा दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारा आजार आहे. यामुळे दरवर्षी शेकडो लोक बाधित होतात. प्रौढांसोबत लहान मुलेही मोठ्या प्रमाणात खराब अन्नामुळे होणाऱ्या समस्यांना बळी पडतात आणि कधीकधी त्यांना आपला जीवही गमवावा लागतो.

जागतिक अन्न सुरक्षा दिन 2023 थीम

जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी या विशेष दिवसाची थीम ठरवते. यंदा 2023 ची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' अशी आहे.