Leg Pain: पायात सतत होतायत वेदना? दुर्लक्ष करू नका असू शकतात 'या' गंभीर समस्या!

Causes Of Leg Pain: आज आम्ही अशाच 5 आरोग्य समस्यांबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचं मुख्य लक्षणं म्हणजे पायातील सततच्या वेदना आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पायात सतत वेदना होत असतील हे सावध करणारी लक्षणं आहेत.

सुरभि जगदीश | Updated: Jul 17, 2024, 06:37 PM IST
Leg Pain: पायात सतत होतायत वेदना? दुर्लक्ष करू नका असू शकतात 'या' गंभीर समस्या! title=

Causes Of Leg Pain: पायात वेदना झाल्या किंवा अचानक पाय दुखू लागला तर आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. अनेकदा या दुखण्याला आपण सामन्य म्हणून सोडून देतो. जास्त चालण्यामुळे पायांच्या स्नायूंमध्ये वेदना होतात. पण जर तुम्ही रोज पाय दुखत असल्याची तक्रार करत असाल तर ते एखाद्या आजाराचं लक्षणही असू शकते. 

आज आम्ही अशाच 5 आरोग्य समस्यांबद्दल माहिती देणार आहोत, ज्याचं मुख्य लक्षणं म्हणजे पायातील सततच्या वेदना आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पायात सतत वेदना होत असतील हे सावध करणारी लक्षणं आहेत. 

हॅमस्ट्रिंगची समस्या

पायांमध्ये अचानक तीव्र वेदना, जे बहुतेक पायांच्या मागील भागात उद्भवते आणि कोणत्याही प्रकारच्या एक्टिव्हीटीने वाढते. अनेकदा पायांमध्ये कडकपणा जाणवू शकतात.

पेरिफेरल आर्टरी डिजीज

पायांमध्ये वेदना, क्रॅम्प येणं, थकवा आणि सुन्नपणा हे पेरिफेरल आर्टरी डिजीजचं लक्षण असू शकतं. ही समस्या धूम्रपान, मधुमेह आणि उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या परिस्थितीमुळे उद्भवण्याची शक्यता असते.

वेरिकोज वेन्स

पायात निळ्या किंवा जांभळ्या फुगलेल्या शिरा दिसणं या समस्येला वेरिकोज वेन्स म्हणतात. रक्तप्रवाहात अडथळे आल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून झालेल्या गाठींचा नसा मध्ये, पाय दुखणे, जडपणा आणि थकवा यांसारखी लक्षणं दिसतात.

प्लांटर फॅसिटायटिस

प्लांटर फॅसिटायटिस या समस्येमध्ये पायाच्या तळव्यामध्ये वेदना होतात. यावेळी विशेषत: सकाळी उठल्यावर किंवा बराच वेळ उभे राहिल्यानंतर या वेदना जाणवू लागतात. पायाच्या खालच्या भागात असलेल्या प्लांटर फॅसिआमध्ये सूज आल्याने ही समस्या उद्भवते. टाचेच्या जवळ किंवा पायाच्या बोटाच्या व्यक्तीला वेदना जाणवू शकतात. 

संधिवात

सांध्यातील वेदना, कडकपणा आणि सूज ही सांधेदुखीची लक्षणं मानलं जातं. ही समस्या सामान्यतः गुडघे आणि हिप्समध्येही प्रभावित करते. मात्र अनेकदा पायांच्या सांध्यामध्ये देखील उद्भवू शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)