Corona In China : चीनमधलं धडकी भरवणारं ही दृश्य पुन्हा एकदा समोर आलीयेत. कोरोनाच्या रुग्णांनी खचाखच हॉस्पिटल्स भरली आहे. बेड रिकामा नसल्याने आता जमिनीवरच उपचार सुरु करण्यात आलेत. शेळ्या मेंढ्यांसारखे पटापट मरणारे रुग्ण... आणि हॉस्पिटलमध्ये मृतदेहांचे खच... चीनमध्ये कोरोनामुळे पुन्हा असं मृत्यूचं तांडव सुरू आहे.
चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एवढी झपाट्याने वाढली आहे की, हॉस्पिटलमधली व्यवस्थाही कमी पडू लागलीये. बेडसोबत व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा देखील तुटवडा भासतोय.
केवळ चीनच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर पुन्हा वाढलाय. गेल्या 24 तासांमध्ये काही देशांमध्ये इतके मृत्यू नोंदवण्यात आलेत.
अमेरिकेतील संस्था एनपीआरमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या अहवालानुसार, कोरोनाच्या या लाटेत देशातील जवळपास 60 टक्के लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. येल युनिवर्सिटीतील सार्वजनिक आरोग्यावर रिसर्च करणाऱ्या तसंच चिनी आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ शी चेन यांनी हा अहवाल सादर केलाय. याचाच अर्थ येणाऱ्या 90 दिवसांमध्ये पृथ्वीवरच्या तब्बल 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे.
चीनसह संपूर्ण जगभरात पसरलेली कोरोनाची नवी लाट भारतातही येण्याची शक्यता आहे.. तिचा मुकाबला करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे. लॉकडाऊनची वेळ येऊ नये, असं वाटत असेल तर आतापासूनच सतर्क राहा, सेफ राहा... आणि मास्क लावा.