ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएटंचा हाहाकार; भारतालाही तिसऱ्या लाटेत धोका?

ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे.

Updated: Jun 20, 2021, 11:03 AM IST
ब्रिटनमध्ये डेल्टा वेरिएटंचा हाहाकार; भारतालाही तिसऱ्या लाटेत धोका? title=

मुंबई : जगभरातील बहुतांश देश कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहेत. अशातच कोरोनाची एका मागोमग एक नवी लाट येत आहे. नुकतंच ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. डेल्टा या विषाणूमुळे सध्या तिसरी लाट आली आहे असं ब्रिटीश सरकारला सल्ला देणारे डॉ. अॅडम फिन यांनी म्हटलंय. 

ब्रिटनमध्ये सध्य़ा लसीकरण पूर्ण करण्यावरही भर दिला जातोय. तर दुसरीकडे तिस-या लाटेमुळे रूग्णवाढही होताना दिसते. मात्र लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तिसरी लाट फार वेगाने पसरणार नाही अशी शक्यताही व्यक्त करण्यात येतेय. लसीचा एक डोस  घेतला असेल तरी कोरोनाबाधित होण्याची आणि रूग्णालयात दाखल होण्याची गरज जवळपास ७५ टक्के कमी होतं असं पब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटलंय. 

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अॅडम फिन यांच्या माहितीप्रमाणे, ब्रिटनमध्ये सध्या अधिकाअधिक लोकांचं लसीकरणं करण्यावर भर देण्यात येतोय. यासोबतच ब्रिटन डेल्टा विषाणू या आव्हानांचाही सामना करत आहे.

सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असून ती यापेक्षा अधिक वेगाने होणार नाही अशी अपेक्षा आपण ठेवू. मात्र आता ही तिसरी लाट आता सुरू आहे, असं ठामपणे म्हणता येईल. ज्येष्ठ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यावर डेल्टाची तिसरी लाट कितपत रोखू शकतो, हे प्रामुख्याने अवलंबून असल्याचंही फिन यांनी म्हटलंय.

दरम्यान भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोना व्हायरसची तिसरी लाट येऊ शकते, असं मत ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केलंय.