Family plannigसाठी केवळ मानसिकताच नाही तर ही गोष्टही कारणीभूत

पुरुषांमध्ये वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलीटीसंदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात.

Updated: Aug 1, 2021, 03:52 PM IST
Family plannigसाठी केवळ मानसिकताच नाही तर ही गोष्टही कारणीभूत

मुंबई : आजकाल, पुरुषांमध्ये वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलीटीसंदर्भात अनेक प्रश्न विचारले जातात. सर्वात मोठा प्रश्न विचारला जातो. वातावरणात उपस्थित विषारी घटक प्रजननक्षमतेवर परिणाम करत आहेत का? खरं तर, अमेरिकेत पुरुषांचीप्रजनन क्षमता घटण्याच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढली आहे. साधारणपणे एक वर्ष नियमित शारीरिक संबंध असूनही गर्भधारणेला होणाऱ्या अक्षमतेला वंधत्व म्हणतात. अशा परिस्थितीत, डॉक्टर यामागील कारण शोधण्यासाठी मूल्यांकन करतात.

पुरुषांसाठी प्रजननक्षमतेच्या मूल्यांकनाचा आधार सीमनचं विश्लेषण असतं. तर शुक्राणूचं आकलन करण्याच्या अनेक पद्धती आहेत. शुक्राणूंची संख्येची माहिती मिळाल्यानंतर एकूण गतिशील शुक्राणुंना पाहून त्यांत चालण्यास सक्षम असलेल्या शुक्राणूंच्या अंशांचं मूल्यांकन होतं.

वंध्यत्व ही केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, वंध्यत्वाच्या मागे शिक्षणाबरोबरच जनजागृती देखील एक प्रमुख कारण आहे. जर एखाद्या जोडप्याने योग्य वेळी संबंध प्रस्थापित केले तर गर्भधारणा होऊ शकते. त्याच वेळी, महिला आणि पुरुषांचे व्यस्त वेळापत्रक हे देखील याचं एक मोठं कारण आहे. ठराविक वयानंतर जोडप्यांमध्ये वंध्यत्वाच्या समस्या अधिक सामान्य असतात.

एका अहवालानुसार, डॉक्टर म्हणतात की लठ्ठपणापासून हार्मोन असंतुलन आणि आनुवंशिक रोगांमुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अनेक पुरुषांना उपचारांनी मदत मिळते. अनेक जोखीम घटकांवर नियंत्रण असूनही, पुरुषांची प्रजननक्षमता काही दशकांपासून वेगाने कमी होतेय. 

विविध अभ्यासांमध्ये असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, आजच्या घडीला पुरुषांमध्ये पूर्वीपेक्षा कमी शुक्राणू निर्माण होत आहेत. तर आता प्रश्न असा उपस्थित होतोय की यामागील नेमकं कारण काय आहे. 

आजच्या काळात अनेक रसायनांचा सर्रास वापर होताना दिसतोय. अमेरिकेत 80 हजारांहून अधिक रसायनं रजिस्टर्ड आहेत. याचे दुष्परिणाम सध्याच्या व्यवस्थेत समजत नाहीत. पुरावे मिळण्यासाठी अनेकदा बराच कालावधी लागतो. तरच ते बाजारातून काढून टाकले जातात. दरम्यान विषयाची जाणीव असणंही महत्त्वाचं असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.