जिऱ्याचं पाणी खरंच Belly Fat कमी करण्यास मदत करतं? काय आहे सत्य?

 वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे.

Updated: Sep 14, 2022, 06:41 AM IST
जिऱ्याचं पाणी खरंच Belly Fat कमी करण्यास मदत करतं? काय आहे सत्य? title=

मुंबई : आजकाल बदललेली जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतेय. लठ्ठपणामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करतात. पण वजन कमी करणं हे खूप अवघड काम आहे, ज्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे.

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही काही दररोज काही पेयांचा वापर करू शकता. या पेयांच्या सेवनाने वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या पेयांबद्दल जे वजन कमी करण्यास मदत करतात.

वजन कमी करणारी पेयं

जिऱ्याचं पाणी

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचं सेवन करणं खूप फायदेशीर मानले जाते. कारण जिऱ्याचं पाणी हे कमी कॅलरी असलेलं पेय आहे जे पोटाची चरबी बर्न मदत करतं. तसंच, याचं सेवन केल्याने भूक कमी होते, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.

लिंबूपाणी

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचं सेवन करणं खूप फायदेशीर मानलं जातं. कारण लिंबूपाण्यात पेक्टिन फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पोटाची चरबी बर्न मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्या.

धण्याचं पाणी

वजन झपाट्याने कमी करण्यासाठी धण्याच्या पाण्याचं सेवन करणं खूप फायदेशीर मानलं जातं. कारण हे पाणी शरीरात साठलेली चरबी कमी करतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी धणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे आणि नंतर सकाळी गाळून त्याचं पाणी प्यावं.