पावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या सीताफळाचे उपयोग

 पावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध असतो तो फळ म्हणजे सीताफळ. 

Updated: Jul 14, 2019, 06:41 PM IST
पावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या सीताफळाचे उपयोग title=

मुंबई : पावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध असतो तो फळ म्हणजे सीताफळ. सीताफळ कोणाला आवडत नसतील असे फार क्वचीत लोक आहेत. पण ऋतूंमध्ये मिळणाऱ्या फळांचे महत्व आरोग्यास फार लाभदायक असते. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. त्याचप्रमाणे सीताफळाचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. त्यामुळे सिताफळाचे आहात समावेश करणे फार महत्वाचे आहे. 

- सीताफळामध्ये तांबे-लोहं असल्यामुळे त्याचा गर्भवती महिलांसाठी देखील खूप फायदा आहे.

- सीताफळ खाल्याने पचनक्रिया सुधारते. शरीरात रक्ताची योग्य पातळी राखण्यास मदत होते.

- अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.

- छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो. 

- लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे. 

- हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.