किचनमधील या '३' गोष्टी असतात सर्वात अस्वच्छ!

स्वयंपाकघरातील या गोष्टी खरं तर खूप कामाच्या, अगदी उपयोगी. पण याच गोष्टी गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात.

Updated: Aug 3, 2018, 02:28 PM IST
किचनमधील या '३' गोष्टी असतात सर्वात अस्वच्छ! title=

मुंबई : स्वयंपाकघरातील या गोष्टी खरं तर खूप कामाच्या, अगदी उपयोगी. पण याच गोष्टी गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात. ऐकायला थोडे अजीब वाटत असले तरी हे अगदी खरे आहे. स्वयंपाकघरातील या गोष्टी गंभीर आजारांना कारणीभूत ठरु शकतील. पाहुया कोणत्या आहेत त्या गोष्टी...

# अलिकडेच झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झाले आहे. स्वयंपाकघरातील स्वच्छतेसाठी वापरला जाणारा कपडा सर्वात जास्त खराब असतो. घरातील सर्वात अस्वच्छ गोष्टीत त्याचा समावेश होतो. त्यामुळे किटाणूंना आमंत्रण मिळते. या कपड्यामुळे फुड पॉईजनिंग होण्याचा धोका असतो. सावधान ! किचन टॉवेल जीवावर बेततोय - संशोधकांचा धक्कादायक दावा

# किचन कपड्यानंतर दुसरी अस्वच्छ गोष्ट म्हणजे भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा स्पंज. भांडी घासण्यासाठी वापरऱ्या जाणाऱ्या स्पंजमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
एक संशोधनातून हे दिसून आले की, स्पंजमध्ये खाण्याचे कण चिकटून राहतात. ते सडल्यानंतर त्यात बॅक्टेरियांची पैदास होते. त्यानंतर हे तुमच्या हातांद्वारे तोंडात आणि तिथून शरीरात प्रवेश करतात. परिणामी आजारांना आमंत्रण मिळते. यात टायफाईड, कॉलरा आणि फूड पॉयजनिंग पसरवणारे बॅक्टेरिया असतात. 

# स्वयंपाकघरातील ज्या सिंकमध्ये तुम्ही रोज भांडी घासता ते देखील आरोग्यासाठी नुकसानकारक असते. भांडी घासल्यानंतर तुम्ही सिंकही घासून चमकवता. मग तुम्हाला वाटते की ते साफ झाले. पण खरंतर तसं नाहीये. कारण सिंकला अॅटॅच पाईप असतो. त्याची सफाई मात्र होत नाही आणि त्यात अनेक बॅक्टेरियांची पैदास होते. त्याचबरोबर पाईपातून कॉकरोच सिंकमध्ये येतात. त्यामुळे वेळोवेळी पाईपही साफ करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सिंकमध्ये नेप्थलीनची गोळी घालून ठेवा.