Tea for Control Diabetes : भारतात मधुमेह (Diabetes) ही एक मोठी समस्या आहे, जवळपास प्रत्येक घरात तुम्हाला डायबेटीस रुग्ण आढळतील. कोरोना (Corona) नंतर लोकांमध्ये मधुमेहाची समस्या वाढली आहे. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांची साखरेची पातळी सामान्य कशी राहील याची सर्वाधिक चिंता असते. शुगर लेव्हल (Suger Level) नॉर्मल ठेवण्यासाठी औषधांव्यतिरिक्त तुम्ही घरगुती उपाय देखील करू शकता.
आज आम्ही तुम्हाला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीच्या वापराविषयी माहिती देत आहोत. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि स्वादुपिंडातून इन्सुलिन हार्मोन बंद होतो. मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. टाईप 2 मधुमेह जास्त धोकादायक आहे. दालचिनीचा चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. साखरेच्या रुग्णांनी दररोज दालचिनीचे सेवन करावे, यामुळे शुगर नियंत्रित होते.
दालचिनीमध्ये अमीनो अॅसिड, फायबर, मॅंगनीज, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारख्या अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जर्नल ऑफ डायबिटीज सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार दालचिनी इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करू शकते.
दालचिनीचा चहा कसा बनवायचा?
दालचिनीचा चहा घरी बनवायला सर्वात सोपा आहे. एका पातेल्यात २ कमी पाणी टाका. आता त्यात 1 दालचिनीची काडी टाका. त्यात चिमूटभर ओवा आणि काळे मीठ घाला. आता हे 10 मिनिटे उकळू द्या. आता पातेल्यात फक्त १ कप पाणी उरले की गॅस बंद करा. एका कपमध्ये गाळून प्या. आता चहा तयार आहे, तुम्ही तो पिऊ शकता.
दुधासोबतही सेवन
शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी दालचिनीचे दूध प्यावे. यासाठी फक्त एक ते दोन चमचे दालचिनी पावडर एक कप दुधात मिसळून रोज प्या. जास्त वापर टाळा, तसेच ते घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अस्वीकरण: ही माहिती आयुर्वेदिक प्रिस्क्रिप्शनच्या आधारे लिहिली गेली आहे. त्यांचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.