Diabetes Symptoms from Eye: तुमच्या डोळ्यात दिसतात डायबिटिजचे संकेत? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका...

Diabetes Symptoms from Eyes: भारतात शहरी भागात डायबिटीजच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यासाठी आज सगळ्यांनाच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक (Diabetes and Health) राहणे आवश्यक ठरले आहे. तुमच्या डोळ्यातूनही तुम्हाला डायबिटिजची लक्षणे ओळखता येतील. 

Updated: Feb 22, 2023, 02:43 PM IST
Diabetes Symptoms from Eye: तुमच्या डोळ्यात दिसतात डायबिटिजचे संकेत? 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका... title=

Diabetes Symptoms from Eyes: मधुमेहाची समस्या सगळ्यांनाच सतावते आहे. त्यातून वाढत्या कामाच्या धगधगीमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तर डायबिटीजची समस्या (Diabetes) लोकांमध्ये वाढू लागली आहे. त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घेणेही बंधनकारक झाले आहे. मधुमेहाची समस्या आजकाल कोणत्याही वयातील व्यक्तींना सतावू (Diabetes at young age) लागल्याचे पाहायला मिळते आहे. परंतु अनेकदा लोकांच्या हे लक्षात येत नाही की त्यांच्या शरीरात मधुमेहाची नक्की कोणती लक्षणे (Diabetes symptoms) आहेत? याची माहितीही लक्षात येत नसल्यामुळे आपल्याला त्याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे. मधुमेहाची लक्षणं आपल्या शरीरातील कोणत्या भागातून दिसू शकतात याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आपल्या डोळ्यातूनही मधूमेहाची लक्षणे दिसू शकतात. तेव्हा जाणून घेऊया की नक्की तुमच्या डोळ्यातून कोणती लक्षणं दिसू लागतात. (Diabetes Symptoms from Eye these are the symptoms your eye shows if you are having diabetes what are the symptoms know more health news marathi)

भारतात शहरी भागात डायबिटीजच्या समस्या वाढू लागल्या आहेत. त्यासाठी आज सगळ्यांनाच आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहणे आवश्यक ठरले आहे. सध्या ही समस्या वाढती असल्यानं आता मुंबईसारख्या शहरांना डायबिटीजची राजधानी (Diabetes Capital) म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. या अनारोग्याला आजकाल सगळेच सामोरे जात आहेत. या आजाराची मुख्य कारणं आहेत ती म्हणजे खराब जीवनशैली, शारिरीक व्यायामाची कमतरता, जेनेटिक्स, जास्तीचे कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड ब्रेशर, दारूचे व्यसन, अवेळी झोप, जागरणं, गोड पदार्थ खाणे यांमुळे मोठ्या प्रमाणात मधुमेहाची समस्या वाढण्याचे संकेत आहेत. 

डायबिटीजची प्रमुख लक्षणं असतात ती म्हणजे भुक लागणे, जास्त तहान लागणे त्यानंतर सारखं सारखं लघवीला लागणं. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या डोळ्यांमधूनही मधूमेहाची (Diabetes Symptoms form Eyes) लक्षणे दिसू शकतात. तेव्हा जाणून घेऊया की नक्की ही लक्षणे कोणती आहेत? 

1. जर तुम्हाला कमी दिसायला लागले असेल तर तुम्हाला मधूमेह असण्याची शक्यता आहे. डायबिटिजच्या पेशंट्ससाठी हा त्रास वेळेच्या आधीपासूनच सुरू झाला आहे. जर तुम्हाला कमी दिसू लागले असेल तर वेळीच शुगर टेस्ट करून घ्या कारण त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. तुमची शुगर लेव्हल कमी झाली तर तुम्हाला ही समस्या सतावणार नाही. 

2. आपल्या डोळ्यातील रेटिनाला रक्त पोहचवणारी नस मधूमेहानं डॅमेज होते. त्यामुळे शुगर असलेल्यांना विशेष काळजी घेणे बंधनकारक आहे. ही समस्या तुमच्या अंगलट येऊ शकते. तेव्हा वेळीच यावर उपाययोजना करायला हवी. 

3. ग्लूकोमामुळे डोळ्यातील ब्लड सेल्स यांमुळे डोळ्यातील सेल्स आणि नसांना त्रास होऊ शकतो तेव्हा या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. डायबिटीजमुळे मोतीबिंदूचीही समस्या सुरू होते. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)