मधुमेहाची प्राथमिक लक्षणे

अलिकडील काळात मानवी जीवन हे अत्यंत धकाधकीचे आणि प्रचंड अस्थिर बनले आहे. त्यामुळे त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो. सहाजिकच योग्य काळजी न घेतल्याने मानवी शरीराला विविध आजारांना तोंड द्यावे लागते. या आजारांमध्ये मधुमेहाचा क्रमांक सर्वात आधी लागतो. म्हणूनच जाणून घ्या मधुमेहाची दिसणारी प्राथमिक लक्षणे.

Annaso Chavare | Updated: Mar 25, 2018, 11:06 PM IST
मधुमेहाची प्राथमिक लक्षणे title=

मुंबई : अलिकडील काळात मानवी जीवन हे अत्यंत धकाधकीचे आणि प्रचंड अस्थिर बनले आहे. त्यामुळे त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो. सहाजिकच योग्य काळजी न घेतल्याने मानवी शरीराला विविध आजारांना तोंड द्यावे लागते. या आजारांमध्ये मधुमेहाचा क्रमांक सर्वात आधी लागतो. म्हणूनच जाणून घ्या मधुमेहाची दिसणारी प्राथमिक लक्षणे.

लक्षण 1 – जास्तीत जास्त पाणी प्यावसे वाटणे. वारंवार लगवीला लागने. जास्त पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे. अशा वेळी तहान भागविण्यासाठी काही लोक ज्यूस, सोडा, चॉकलेट, दूध आदी गोष्टींचे सेवन करतात. पण, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिकच वाढते. त्यामुळे होणारा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.

लक्षण 2 – वजन घटने – वजन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणे मधुमेहाला निमंत्रण देते. तसेच, प्रमाणापेक्षा कमी होणे हे सुध्दा मधुमेहाचेच लक्षण आहे. वजन घटण्याचे डॉक्टर दोन कारणे सांगतात. एक वारंवार वॉशरूमला जाणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील वाढत्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवता न येणे.

लक्षण 3 –  अचानक अशक्तपना जाणवने. तीव्र भूक लागने ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणे आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला  अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा हाई ब्लड शुगर असते तेव्हा शरीराला ग्लुकोजला मॅनेज करताना अडचण निर्माण होते.

लक्षण 4  – काम केल्यावर थकवा जाणवने ही अत्यंत साधी बाब आहे. मात्र, नियमितपणे अशक्तपणा जानवणे हा मधुमेहाचे लक्षण दाखवणारा प्रकार आहे. हे लक्षण दिसतात त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करा. टाईप-2 मधुमेहात रूग्णाच्या शरीरातील साखर काही काळासाठी मोठ्या प्रमाणात वाढते. या प्रकाराची लक्षणे हळुहळू पूढे येतात.

लक्षण 5 – चिडचिडेपणा आणि मूड खराब होण्याचे प्रकार वारंवार घडणे हेही मधुमेहाचे लक्षण आहे. शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मधुमेहाचे रूग्ण अधिक चिडचिडे बनतात. सततचे डिप्रेशन, घराबाहेरप पडण्याची ईच्छा न होणे, कामात लक्ष न लागने हेसुद्धा मधुमेहाचे लक्षण मानले जाते.

लक्षण 6 – नजर कमजोर होणे – मधुमेहाच्या सुरूवातीच्या काळात डोळ्यांना अचानक अधारी येणे. निट न दिसणे. अशी लक्षणे दिसतात. पण, मधुमेहात नजर कायमची अधू होत नाही. काही कालावधीनंतर रूग्णाची नजर स्थिर होते. त्याला निट दिसू लागते. (हेही वाचा, किडणी फेल होण्यापूर्वी काय  संकेत मिळतात?)

लक्षण 7 – शरीरावर झालेली कोणतीही जखम लवकर भरून न येणे. जखम चिघळत जाणे. जखमेत खाज होणे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.हे मधुमेहाचे लक्षण असू शकते.

लक्षण 8 – पायाला सतत मुंग्या येणे. पायाला सतत मुंग्या येत असतील अधुनमधून पाय बधीर होत असेल तरीही डॉक्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.

महत्वाची टीप: वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसले तरी, लगेच आपल्याला मधुमेह झाला असे समजून घाबरून जाण्याचे कारण नाही. वरील लक्षणे इतर गोष्टींमुळेही दिसू शकतात. म्हणूनच डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळेत माहिती घेणे केव्हाही फायदेशीर ठरते.