What Is Disease X : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर 'डिसीज एक्स' ( Disease X ) ट्रेंड होताना दिसतोय. हा अज्ञात रोगाची चर्चा बऱ्याच ठिकाणी दिसून येतेय. अहवालात दावा केला जातोय की, हे कदाचित नवीन साथीचे लक्षण असू शकतं. या अज्ञात आणि अप्रत्याशित साथीच्या वाढत्या धोक्याच्या दरम्यान, यूकेच्या शास्त्रज्ञांनी देखील त्याचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केलीये. दरम्यान याचा मानवी जीवनावर किती आणि कसा परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
डिजीज एक्स ( Disease X ) ...हा डिसीज नेमका काय आहे, याची कुणालाच कल्पना नाही. मात्र या आजाराची साथ अख्ख्या जगातील मानवजातीला संकटात टाकू शकेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोना ( Covid 19 ) पेक्षाही भयंकर, खतरनाक आणि प्राणघातक अशी ही डिजीज एक्सची साथ असेल. या महामारीमुळे पृथ्वीतलावरील मानवी अस्तित्व देखील नष्ट होण्याचा धोका संभवतो, अशी चर्चा आहे...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूकेमधील 200 हून अधिक वैज्ञानिकांच्या टीमने यासाठी लसीवर काम सुरू केलंय. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी आणि लस उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, आम्ही यासाठी 100 दिवसांच्या आत संरक्षणात्मक लस तयार करू, जेणेकरून आम्हाला पुन्हा एकदा कोविड-19 सारख्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागणार नाही.
शास्त्रज्ञांची टीम ज्या अज्ञात "डिसीज एक्स" वर चर्चा करतेय तो प्रत्यक्षात नवीन नाही. 2018 मध्येही, एका अहवालात नमूद केलंय की, डिजीज X- आपल्या जगासाठी सर्वात मोठा संसर्गजन्य धोका बनू शकतो. त्यामुळे या डिसीजबाबत जागतिक आरोग्य संघटनेने आधीच इशारा दिल्याचं समजतंय.