Home Remedies to get rid of Red ants : घरामध्ये अधूनमधून मुंग्या येणं शुभ मानलं जातं. मात्र लाल मुंग्या कायमच घरात येऊ लागल्या तर अनेकवेळा घरातील लहान मुलांसह मोठ्यांनाही चावतात. तुम्ही जर लाल मुंग्यांना वैतागला असाल तर काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्याने घरातील मुंग्या कायमच्या पळून जातील. (Do home remedies to get rid of red ants in the house Marathi News)
लिंबू पिळून टाका किंवा लिंबाची साल ठेवा. लादी पुसताना तुम्ही पाण्यात लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकू शकता जेणेकरून जमिनीवर असलेल्या लिंबाचा वास मुंग्यांना पळवून लावेल. कडू आणि आंबट गोष्टी मुंग्यांना घरापासून दूर ठेवतात.
घरात मुंग्या आल्या की खूप त्रास होतो. त्या चावल्यावर तर जीव अगदी नकोसा होतो. त्याचबरोबर साखर, गुळ अशा गोड पदार्थांचे नुकसान होते. अशावेळी किटकनाशकांचा उपयोग करणे मानवी आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. अशावेळी मुंग्यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. या सोप्या उपयांनी मुंग्यांपासून तुमची आणि घराची सुटका होईल.
मुंग्यांपासून सुटका मिळवण्यासाठी दालचिनी देखील एक प्रभावी औषध आहे. यासाठी दालचिनी आणि लवंग एकत्र करून मुंग्या येण्याच्या ठिकाणी ठेवाव्या लागतात. घरामध्ये जिथे मुंग्या आहेत तिथे दालचिनी पावडर आणि लवंग ठेवा. त्यासाठी तुम्ही दालचिनी आणि लवंगचे आवश्यक तेल देखील वापरू शकता.
घरातील कोपऱ्यांवर मीठ शिंपडणे देखील फायदेशीर ठरू शकते. घरातील साधे मीठ तुम्ही फक्त मुंग्यांच्या आवडत्या जागेवर शिंपडू शकता. याशिवाय मीठ पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरूनही वापरता येते. या मिठाच्या पाण्याचे द्रव मुंग्यावर शिंपडल्याने प्रभावी परिणाम पाहायला मिळेल.
मुंग्या घालवण्साठी तुम्ही लाल खडूचाही वापर करू शकता. खरं तर, त्यात कॅल्शियम कार्बोनेट असते, जे मुंग्यांना घरापासून दूर ठेवण्यास मदत करते. मुंग्या जिथून निघतात अशा ठिकाणी खडूचा स्प्रे करू शकता. खडूने एक रेषाही ओढा.
लाल मिरचीमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म आढळतात. लाल मुंग्यांच्या मार्गावर तुम्ही ते हळूहळू शिंपडा. तुमच्या घरात मुंग्या येणं बंद होईल.