ही फळे कधीच एकत्र खावू नयेत, खात असाल तर आताच बंद करा

फळे आरोग्यासाठी चांगली मानली जातात. पण काही फळे एकत्र खाल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Updated: Aug 18, 2021, 09:09 PM IST
ही फळे कधीच एकत्र खावू नयेत, खात असाल तर आताच बंद करा title=

मुंबई : जगात विविध रंगाची आणि विविध चवीची फळे आहेत. ज्याचा आपण आपल्या आहारात देखील समावेश करतो. तशी तर फळे खाणे शरीरीसाठी चांगले असते. पण कधी-कधी 2 फळे एकत्र खाल्याने शरीराला काही नुकसान देखील होऊ शकते. तर मग जाणून घेऊयात की, कोणती फळे ही एकत्र खावू नयेत.

1. पपई आणि लिंब

पपई आणि लिंब एकगत्र खावू नये. कारण यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनशी संबधित समस्या होऊ शकते. यामुळे अ‍ॅनिमिया हा रोग होण्याचीही शक्यता असते.

2. गाजर आणि संत्री

गाजर आणि संत्री एकत्र खाल्याने किडनीशी संबधित समस्यांना उद्भवू शकतात. यामुळे थाचीच जळजळणे आणि पित्त देखील होते.

3. पेरु आणि केळी

पेरु आणि केळ एकत्र खाल्याने पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे डोकेदुखीही होते.

4. टरबूज आणि खरबूज

उन्हाळ्यात ही दोन्ही फळे मोठ्या प्रमाणात खातात. पण ही दोन्ही फळे एकत्र खाल्याने अपचन आणि पोटाच्‍या इतर समस्‍या उद्भवू शकतात.

5. दूध आणि अननस

दुधात असलेले कॅल्शिअम फळांच्या पोषक तत्त्वांचे मिश्रण करते आणि त्यांचे पोषण शरीरात उपलब्ध नसते. अननस आणि दूध एकत्र खावू नये.

6. दही आणि आंबट फळे

दही सोबत कधीही आंबट फळे खाऊ नका. दही आणि आंबट फळांमध्ये एंजाइम असते. त्यामुळे त्याचे पचन नीट होत नाही.

7. दुध आणि केळी

दूध आणि कळी हे दोन्ही पदार्थ एकमेकांना पचण्यापासून रोखतात. दोन्ही पदार्थांच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, हे पदार्थ एकत्र खाल्‍यामुळे शरीराची अन्‍न पचण्‍याची प्रक्रीया बदलते त्यामुळे पोटात गॅस, अपचन निर्माण होऊन उलटी होण्याची शक्यता असते.

8. दूध आणि फणस

दुध आणि फणस एकत्र खाऊ नये. यामुळे त्वचेचे रोग होण्याची शक्यता असते. खाज सुटणं, एग्झिमा, सोरायसीस यांसारखे त्वचेचे रोग होऊ शकतात.

9. संत्री आणि दूध

संत्र हे फळं दुधातील पोषक तत्त्वं शोषून घेतं. त्यामुळे संत्री आणि दूध एकत्र खाऊ नका.

10. मीठ आणि फळे

फळे खाताना त्याला मीठ आणि मसाला लावू नये. यामुळे त्याला रस सुटतो आणि सर्व घटक बाहेर पडतात.