मुंबई : आपल्याकडे बरेच पदार्थ बनवण्यासाठी काजूचा वापर केला जातो. एखादा गोड पदार्थ असला तरी त्याची चव वाढवण्यासाठी आणि डोकोरेशनसाठी आपण काजू वापरतो. तर भाजीच्या ग्रेव्हीमध्ये देखील काजूचा वापर केला जातो. ऐवढंच नाही तर अनेक ठिकाणी काजूची भाजी देखील बनवली जाते. एकंदरीत काय तर काजू ही पदार्थाची चव वाढतो. तसेच काजू आरोग्यासाठी देखील खूप चांगलं असल्याचं मानलं जातं, ज्यामुळे अनेक लोक याला भाजलेले काजू असेच देखील खातात.
परंतु तुम्हाला काजूबद्दल काही गोष्टी माहिती आहेत का? खरंतर सगळ्याच गोष्टीसोबत काजू न खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच काजू खाण्याचे काही नियम देखील आहेत. कारण ते आपल्या शरीरासाठी जितके चांगले आहे, तितके वाईट देखील आहे. चला याबद्दल जाणून घेऊ या.
बरेच लोक हे दारुसोबत चकणा म्हणून काजू खातात. परंतु हे लक्षात घ्या की, काजूसोबत अल्कोहोल कधीही घेऊ नये. हे आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. याशिवाय काजूसोबत खूप गरम पदार्थ खाऊ नयेत. याचे कारण असे की काजूला स्वतः गरम आहे. अशा परिस्थितीत ते शरीरात उष्णता निर्माण करू शकते.
काजूच्या सेवनाने आरोग्याला काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते. जेव्हा तुम्ही जास्त काजू खाता तेव्हा सोडियमचे प्रमाण वाढते. याशिवाय उच्च रक्तदाब, किडनीचा त्रास, पोटाशी संबंधित समस्या, अशक्तपणा, किडनी निकामी होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
वजन वाढण्याऐवजी मर्यादित प्रमाणात काजू खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवता येते.
काजू भिजवून खाल्ल्यास वजन तर कमी होतेच, शिवाय कोलेस्टेरॉल नियंत्रित राहून केसांचे आरोग्यही सुधारते.
काजू गरम असते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात तुम्ही काजूचे सेवन करू शकता. पण उन्हाळ्यातही काजू मर्यादित प्रमाणात खाऊ शकता.
तुम्ही काजूचे सेवन काजू कटलीच्या स्वरूपात किंवा काजू स्मूदीच्या स्वरूपात करू शकता. तुम्ही काजू शेक किंवा तळलेल्या स्वरूपातही काजू खाऊ शकता. याशिवाय तुम्ही साधे काजूही खाऊ शकता.
रिकाम्या पोटी काजू खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते. याशिवाय उच्च रक्तदाब, गॅस, ब्लोटिंग, किडनीशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.
एका दिवसात 6 ते 7 काजू खाऊ शकतात. तथापि, परंतु सर्वसामान्यता ही संख्या तुमचे वय आणि आरोग्य यावर अवलंबून असते.
काजूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 इत्यादी असतात, ज्यांच्या सेवनाने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.