मुंबई : सेक्स जोडप्यांना आनंद देतो. एका अभ्यासानुसार समोर आलेल्या माहितीप्रमाणे, नियमित सेक्स केल्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं. त्याचप्रमाणे ताणतणाव कमी होऊन शात झोप लागण्यासंही मदत होते. सेक्समुळे होणाऱ्या फायद्यांनी महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. दरम्यान महिलांच्या मनात एक प्रश्न असतो, तो म्हणजे सेक्स केल्याने वजनात वाढ होते का?
महिलांच्या वाढत्या वजनामुळे त्यांना हा प्रश्न नेहमी सतावतो. तर या आज जाणून घेऊया नियमित सेक्स केल्याने वजनात वाढ होते का यामध्ये किती तथ्य आहे.
सेक्सुअल हेल्थ एक्सपर्ट यांच्या सांगण्यानुसार, सेक्स केल्याने वजनात वाढ होत नाही. पण हो, सेक्स हार्मोन्सच्या असंतुलनामुळे वजनात वाढ होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, या गोष्टींचा तुमच्या लैंगिक संबंधांशी नक्कीच काही संबंध नाही. सेक्स हार्मोन्स स्त्रियांचं वय, मासिक पाळी यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतात. महिलांच्या शरीरात डीएचईए हार्मोन (सेक्स हार्मोन) ची कमतरता असल्यास त्यांचं वजन वाढू लागते.
सेक्सुअल हेल्थ एक्सपर्ट पुढे सांगतात की, लग्नानंतर महिलांच्या वजनात वाढ होते. या वजन वाढला महिला थेट सेक्सशी जोडतात. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, लग्नानंतर केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्याही वजनात वाढ होते. यामागे विविध गोष्टी कारणीभूत असू शकतात.