ब्रेस्ट पेन होत असेल तर दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतं ब्रेस्ट पेन

 ब्रेस्ट पेनचा त्रास हा महिलांना प्रथम किशोरवयात होतो.

Updated: Jul 25, 2021, 09:20 AM IST
ब्रेस्ट पेन होत असेल तर दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतं ब्रेस्ट पेन

मुंबई : ब्रेस्ट पेनचा त्रास हा महिलांना प्रथम किशोरवयात होतो. कारण त्यावेळेस मुलींच्या शरीरात हार्मोनल चेंजेस होतात. यावेळी विविध कारणांमुळे वेदनांचा सामना करावा लागतो. अनेक प्रकरणांमध्ये या वेदना सामान्य असतात. थोडीशी काळजी घेतल्यानंतर हा त्रास कमी केला जाऊ शकतो. तर जाणून घेऊया कोणत्या परिस्थितीत ब्रेस्ट पेनकडे दुर्लक्ष करू नये.

ब्रेस्ट पेन का होतं?

 • किशोर वयात मुलीमध्ये शरीरातील अवयवांचा विकास होतो त्यावेळी काही महिलांना ब्रेस्ट पेनचा सामना करावा लागतो
 • पिरीयड्स सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात, शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे ब्रेस्ट पेन होऊ शकतं. पिरीयड्समध्ये त्या महिलांना ब्रेस्ट पेनचा त्रास 
 • जाणवतो ज्यांचे पिरीयड्स अनियमित असण्याचा त्रास असतो.

ब्रेस्ट पेन होण्याची अन्य कारणं

 • पहिला बाळाच्या जन्मानंतर ज्या महिला स्तनपान देतात त्यांना अनेकदा ब्रेस्ट पेनचा त्रास जाणवतो. 
 • योग्य साइजची ब्रा वापरली नाही तरीही ब्रेस्ट पेनचा त्रास जाणवतो. टाइट ब्राच्या वापराने त्वचेवर आणि स्नायूंवर ताण येतो यामुळे वेदना होऊ शकतात
 • मेनोपॉज म्हणजेच रोजनिवृत्तीच्या काळात महिलांना ब्रेस्ट पेन होऊ शकतं. या काळात शरीरात हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे हा त्रास होऊ शकतो.

लाईफस्टाईल आणि खाण्या-पिण्याशी निगडीत काही गोष्टी

 • चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे आणि जीवनशैलीशी संबंधित काही क्रियामुळे ब्रेस्टचा त्रास सहन करावा लागतो. जसं की, धावणं आणि व्यायामादरम्यान योग्य 
 • योग्य साइजची ब्रा न निवडणं, झोपेच्या वेळेस चुकीच पोश्चर, पीरियड्समध्ये आंबट आणि थंड पदार्थांचं अधिक सेवन.
 • ज्या स्त्रिया चहा, कॉफी, सोडा आणि अल्कोहोलचं जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांना बहुधा हा त्रास जाणवतो. 

निष्काळजीपणा आणि हार्मोन्समध्ये बदल

 • ज्या स्त्रिया अँटिडिप्रेशनची औषधं योग्य प्रकारे घेत नाहीत किंवा त्यांच्या इच्छेनुसार औषधं घेणं बंद करतात त्यांना ब्रेस्ट पेन होण्याची समस्या अधिक असते.
 • कारण मानसिक आजाराशी संबंधित औषधं आपल्या शरीरात हार्मोनल संतुलित राखण्याचं काम कार्य करतात. जर ही औषधं अनियमितपणे घेतली गेली तर 
 • शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन होतं, जे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट पेनच्या रूपात येऊ शकतं.