गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून पिणे आरोग्यासाठी वरदान! फायदे जाणून तुम्ही सुरु कराल

Health Tips : आयुर्वैदानुसार तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पण तुम्हाला गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने कोणते फायदे मिळतात माहितीये का? हे फायदे समजल्यास तुम्ही आजपासूनच गरम पाण्यात तूप मिक्स करुन प्यायला सुरुवात कराल.   

नेहा चौधरी | Updated: Nov 30, 2024, 08:33 PM IST
गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून पिणे आरोग्यासाठी वरदान! फायदे जाणून तुम्ही सुरु कराल title=
Health Tips

Health Tips : आयुर्वेदात तूप हे अमृत मानलं गेलंय. या तूपमाध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जातात. डॉक्टर असो किंवा डाइटिशियन आज प्रत्येक जणाला तुपाचं महत्त्व समजलंय. जुन्या काळातील लोक तुपाशिवाय त्यांचं जेवण होत नाही. गरमा गरम पोळीवर किंवा गरम गरम वरण भातावर तुपाची धार चवीला तर छान वाटतोच पण आरोग्यासाठी वरदान ठरतो. पण तुम्हाला गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदा होतात, हे माहितीय का? (Drinking a spoonful of ghee mixed with hot water ghee in warm water benefits Health Tips )

गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने काय फायदा होतात?

गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते, असं तज्ज्ञ सांगतात. तूप गरम पाण्याचे सेवन नियमित केल्यास थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. तुपात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के सारखे अनेक पोषक घटक असतात.  जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. 

पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत 

गरम पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत मिळते. तुपामध्ये असलेले गुणधर्म आतडे स्वच्छ करण्यास फायदा होता. ज्यामुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात. तुपामुळे पचनशक्ती वाढते, त्यामुळे अन्न सहज पचण्यास मदत मिळते.

त्वचा आणि केसांसाठी वरदान

तुपातील जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे पोषण करतात, ती चमकतात आणि सुरकुत्या कमी करण्यास फायदेशीर ठरते. तसंच, ते केस मजबूत आणि मऊ करतं आणि कोंडा दूर होण्यास मदत मिळते. 

इम्युनिटी बूस्टर

तुपात असलेले फॅटी अ‍ॅसिड रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या संसर्गापासून सुरक्षित राहते. तुपात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी हे आवश्यक आहे.

हाडे मजबूत करते

तुपात कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. हे ऑस्टियोपोरोसिससारख्या आजारांपासून संरक्षण करते. तुपातील काही घटक जळजळ कमी करू शकतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

मेंदूसाठी फायदेशीर

तुपातील फॅटी ॲसिड मेंदूच्या पेशींचे पोषण करतात, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तूप मेंदूला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे पुरवून नसा मजबूत करते. त्यामुळे अल्झायमरसारख्या आजारांनाही प्रतिबंध करता येतो.
तुपातील काही घटक वजन कमी करण्यासाठी चयापचय वाढवण्यास मदत करतात. चयापचय वाढल्याने कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

कधी करावं सेवन करावं ?

सर्वात महत्त्वाचं तूप आणि गरम पाण्याचे सेवन करुन त्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला घरचं तूप लागणार आहे. या पाण्याचं सेवन तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्याचा एक तासापूर्वी करावे. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)