Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम

Dry Cough Cure: हिवाळ्यात अनेक आराज जडतात. यात सर्दी आणि खोकल्याचा जास्त त्रास होतो. तुम्हाला कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नसेल तर तुम्हाला या घरगुती उपायांनी आराम  मिळेल.

Updated: Nov 26, 2022, 12:52 PM IST
Dry Cough: कोरड्या खोकल्यामुळे रात्री झोप येत नाही, या घरगुती उपायांनी मिळेल आराम  title=

Dry Cough Home Remedies: थंडीचा मोसम सुरु झालाय.  जेव्हा कोरडा खोकला येतो तेव्हा दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करण्यात खूप त्रास होतो. हिवाळा सुरु होताच, अनेक प्रकारचे इंफेक्शन तुमच्या शरीरावर आक्रमण करु लागतात, त्यानंतर कोरड्या खोकल्याची समस्या उद्भवू शकते. एखाद्याला हा आजार झाला की तो सहजासहजी सुटत नाही, मग तुम्हाला खोकल्यामध्ये रात्र जागून काढावी लागते. त्यामुळे तुम्हाला शांत झोप येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला थकवा, सुस्त आणि चिडचिड वाटते. काही वेळा औषध आणि कफ सिरपचाही लगेच परिणाम होत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही काही खास घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. आजींच्या काळापासून चालत आलेल्या या अशा पाककृती आहेत, त्यामुळे आराम मिळतो.

कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय  

1. गरम पाणी आणि मध
हिवाळ्यात थंड पाणी पिणे टाळा आणि गरम पाण्याचे सेवन वाढवा. एका ग्लासात कोमट पाण्यात चार चमचे मध मिसळून प्यायल्यास कोरड्या खोकल्यापासून पूर्ण आराम मिळेल. आपण गरम पाणी आणि मध नियमितपणे पिऊ शकता, ज्यामुळे अनेक रोगांपासून यामुळे बचाव होऊ शकतो.

2. आले आणि मीठ
आले एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, जो आपल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तो थंडीवर रामबाण उपायापेक्षा कमी नाही. कोरडा खोकला लागला असेल तर तुम्ही ते कच्चे चावू शकता किंवा त्याचा रस पिऊ शकता, पण आले कडू असल्याने आले आणि मीठ एकत्र करुन त्याचा कडूपणा कमी होतो. यामुळे कोरडा खोकला बरा होईल.

3. काळी मिरी
 मध आणि काळी मिरी यांचे मिश्रण सर्दी आणि खोकल्याचा शत्रू मानले जाते. यासाठी तुम्ही 4-5 काळ्या मिरींचे दाणे घेऊन त्याची पावडर बनवा. आता ते मधात मिसळल्यानंतर खा. दिवसातून दोन ते तीन वेळा याचे सेवन केल्यास कोरड्या खोकल्यापासून मुक्ती मिळते.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)