Dry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड

What Is Dry Eye: डोळे हे अगदी नाजूक असतात. त्यांची नेहमी चांगली काळजी घेण्याची गरज आहे. कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि उपचार याबाबत तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. कोरड्या डोळ्याच्या समस्येबद्दल तुम्ही कमी ऐकले असेल, परंतु हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते आणि आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते.

Updated: Oct 16, 2022, 11:05 AM IST
Dry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड  title=

Dry Eyes Symptoms And Cure: नेहमी डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे. दुर्लक्ष केले तर ते तुम्हाला चांगलेच महागात पडेल. कोरड्या डोळ्याची समस्या उद्भवते तेव्हा डोळ्यांमधून खूप कमी अश्रू येतात किंवा अश्रू खूप कोरडे होतात. ही स्थिती एक किंवा दोन्ही डोळ्यांवर परिणाम करु शकते. संभाव्य लक्षणांमध्ये डोळा दुखणे किंवा अस्वस्थता, अंधुक दृष्टी आणि प्रकाशाची वाढलेली संवेदनशीलता यांचा समावेश होतो. 

कोरड्या डोळ्याची समस्या सौम्य ते गंभीर असू शकते. ओव्हर-द-काउंटर (OTC) उपचार सौम्य प्रकरणांमध्ये दिले जाऊ शकतात, तर अधिक गंभीर प्रकरणांमध्ये चांगल्या उपचारांची आवश्यकता असते, काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया देखील आवश्यक असते. जीवनशैलीतील बदल देखील या वैद्यकीय स्थितीवर उपचार आणि व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरु शकतात. 

कोरड्या अश्रुमुळे या समस्या उद्भवतात

1. डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि वेदना
2. डोळ्यांमध्ये ठेचणे किंवा जळजळ
होणे 
3. डोळ्यांच्या आजूबाजूला श्लेष्म घट्ट होणे
4. धूळ तसेच वाऱ्याच्यावेळी डोळ्यांना त्रास होणे 
5. प्रकाशाचा त्रास जाणवणे
6. दिवसाच्या अखेरीस अंधुक दृष्टी होणे
7. दोन चित्र दिसणे
8. वाचल्यानंतर डोळ्यांचा थकवा येणे
9. डोळे उघडे ठेवण्याची अडचण येणे
10. कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरल्यानंतर येणारी अस्वस्थता 
11. जागे असताना पापण्या चिकटून राहणे

या 2 पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे डोळा होतो कोरडा  

यूएसच्या नॅशनल आय इन्स्टिट्यूटच्या (NIA) विश्वासार्ह स्त्रोतानुसार, व्हिटॅमिन ए किंवा ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळे एखाद्या व्यक्तीला कोरडे डोळे होण्याचा धोका वाढू शकतो. याव्यतिरिक्त, संशोधन असे सूचित करते की व्हिटॅमिन ए किंवा ओमेगा 3 पूरक कोरड्या डोळ्यांच्या विद्यमान प्रकरणांवर उपचार करण्यास मदत करु शकतात.

व्हिटॅमिन ए फायदेशीर

कोरड्या डोळ्यांसह 30 पुरुष सहभागींच्या 2019 च्या छोट्या अभ्यासात असे आढळून आले की, अल्पकालीन व्हिटॅमिन ए पूरकतेमुळे अश्रूंची गुणवत्ता सुधारली. परंतु अश्रूंचे प्रमाण नाही. संशोधकांनी नमूद केले की कोरड्या डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए अभावामुळे समस्या निर्माण होते.  व्हिटॅमिन ए प्रावशीलता निश्चित करण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

व्हिटॅमिन ए असलेले अन्न

-यकृत
-तेलकट मासे
-अंडी
-चीज
 -दूध आणि दही
-लाल भाज्या
-हिरव्या पालेभाज्या

ओमेगा 3 देखील महत्त्वाचे
2019 मध्ये, 17 रॅडम क्लिनिकल चाचण्यांच्या मेटा-विश्लेषणात असे आढळून आले की, प्लेसीबोच्या तुलनेत ओमेगा 3 फॅटीअ‍ॅसिड सप्लिमेंटेशनने कोरड्या डोळ्यांच्या आजाराच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा केली. संशोधकांनी निष्कर्ष काढला की ओमेगा 3 सप्लिमेंटेशन कोरड्या डोळ्यासाठी एक प्रभावी उपचार सिद्ध होऊ शकते.

- ओमेगा 3 पदार्थ
- तेलकट मासे 
- सी फूड्स
- फ्लेक्स बियाणे
- सोयाबीन
- कॅनोला तेल

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS  याची पुष्टी करत नाही.)