Cerebral palsy : लहान मुलांच्या सामान्य हालचाली मध्ये असलेली अक्षमता म्हणजे सीपी. सेरेब्रल म्हणजे मेंदूशी संबंधित आणि पाल्सी म्हणजे स्नायूंचा वापर करण्यातील समस्या किंवा अक्षमता. मेंदूच्या विकासातील असामान्यपणा किंवा विकसित होताना मेंदूला झालेली इजा ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या/तिच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम यामुळे सिपी होतो.
डायरेक्टर-क्लिनिकल जीनोमिक्स डेव्हलपमेंट अँड इम्प्लीमेंटेशनच्या डॉ. डॉ शीतल शारदा म्हणाल्या की, सेरेब्रल पाल्सीचे लवकर निदान आणि उपाययोजना करणे हा आजार असलेल्या व्यक्तींमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत.
काही वेळा, एमआरआय (MRI) किंवा सिटी स्कॅन(CT) सारख्या ब्रेन इमेजिंगच्या मदतीने जन्मानंतर लगेचच मेंदूमधील असामान्यपणा समजतो, याने लवकर निदान करण्यात मदत मिळते.
जास्त धोके असलेले गट: मुदतपूर्व जन्म किंवा जन्मतः वजन कमी किंवा जन्माला येताना काही समस्या असलेल्या बाळांना सिपी होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यांची योग्य खबरदारी घेणे आवश्यक असते.
पेडीएट्रिक न्यूरोलॉजिस्ट किंवा डेव्हलपमेंटल पेडीएट्रिशियन यांच्या कडून क्लिनिकल असेसमेंट करून घेणे आवश्यक आहे. ते मसल टोन, प्रतिक्षेप, समन्वय आणि इतर न्यूरोलॉजिकल चिन्हांचे असेसमेंट करतात.
सेरेब्रल पाल्सी हे डायग्नोसिस ऑफ एक्सक्लूजन आहे आणि निदानासाठी संभाव्य एटिओलॉजी देऊ शकणारे कोणतेही अनुवांशिक कारण नाकारणे महत्वाचे आहे. पेडीएट्रिक न्यूरोलॉजिस्ट आणि क्लिनिकल जेनेटिकिस्ट मुलामधील CP चे कारण समजून घेण्यासाठी अनुवांशिक चाचणीचा परिणाम समजून घेण्यास मदत करू शकतात.
सिपी असल्याचा संशय आला किंवा तसे निदान झाल्यास फिजिकल थेरपी, ऑकयू पेशनल थेरपी आणि स्पीच थेरपी सारख्या सुरुवातीच्या उपाययोजना शक्य तितक्या लवकर सुरू कराव्या.
या थेरपीज सामान्य हालचाली, संवाद आणि एकंदरीत विकास यासाठी असतात.
स्नायू शिथिल करणारी औषधे किंवा बोटुलिनम टॉक्सिन इंजेक्शन्स यासारखी औषधे स्पॅस्टिकिटी व्यवस्थापित करण्यासाठी आणि गतिशीलता सुधारण्यासाठी वापरली जाऊ शकतात.
पालक किंवा देखभाल करणारी व्यक्ति यांची मुलाच्या विकासात महत्वाची भूमिका असते. त्यांना सिपी, थेरपीचे व्यायाम आणि योग्य वातावरण कसे ठेवता येईल याची काळजी घेण्याविषयी सर्व माहिती देणे /शिक्षित करणे आवश्यक आहे
सिपी ही आजीवन समस्या आहे आणि उपचार योजनांचे नियमितपणे पुनर्मूल्यांकन केले पाहिजे आणि व्यक्तीच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यात बदल करणे आवश्यक आहे.
शेवटी, लवकर निदान आणि उपचार यामुळे मुलाचे जीवन सुकर होण्यास आणि मदत होते आणि सेरेब्रल पाल्सीच्या व्यवस्थापनात दीर्घकालीन परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते. आपल्या मुलाच्या योग्य देखभाली साठी पालक आणि देखभाल करणाऱ्यांनी डॉक्टरांच्या मदतीने काळजी घेणे आवश्यक आहे