मुंबई : भारतात, जेवणाची चव वाढवण्यासाठी, कोशिंबीरीचं सेवन केलं जातं. दरम्यान आपल्या कोशिंबीरीमध्ये निश्चितपणे काकडीचा समावेश केला जातो. वजन लवकर कमी करण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काकडी फायदेशीर मानली जातो. काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्याच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी कायम राहते. काकडीचेही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
दरम्यान आजकाल उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्येही काकडीचं सेवन फायदेशीर मानले जाते. काकडी खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. काकडी खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी कशी संतुलित केली जाऊ शकते ते जाणून घेऊया.
नियमितपणे काकडीच्या सेवनाने शरीराला हानिकारक जंतू आणि विषारी पदार्थ बाहेर टाकणं सोपं होतं. परिणामी पाचन तंत्र निरोगी होतं. काकडी केवळ डिहायड्रेशन दूर करत नाही तर त्यात भरपूर फायबर देखील असतं, जे चांगल्या आतड्यांतील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकतं. काकडीमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाणही चांगलं असतं आणि हे कमी कॅलरी असलेलं फळ आहे.
काकडीत 96% पर्यंत पाण्याचं प्रमाण असतं, जे तुम्हाला हायड्रेट ठेवू शकतं आणि तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतं. काकडीच्या सेवनाने पेशींना योग्य पोषण मिळतं. म्हणून, काकडी देखील एक चांगला स्नॅकिंग पर्याय आहे.