Roti and Rice : जेवणाच्या ताटात दररोज पोळी- भात असतोच? ही माहिती वाचून म्हणाल नको रे बाबा!

Roti and Rice pros and cons : जेवणाचं ताट तुम्ही कधी व्यवस्थित पाहिलंय का? भारतातील आहारामध्ये सहसा पोळी- चपातीचा समावेश असतो, पण...   

Updated: Dec 23, 2022, 09:02 AM IST
Roti and Rice : जेवणाच्या ताटात दररोज पोळी- भात असतोच? ही माहिती वाचून म्हणाल नको रे बाबा!  title=
eating roti and rice in lunch dinner is beneficial or not

Roti and Rice pros and cons : घड्याळाचा काटा अमुक एका आकड्यावर गेला की आपोआपच भूक लागते. पोटात कावळे ओरडू लागतात आणि काहीजण तर वेडेपिसे होतात. आम्हाला की नई, भूक आवरताच येत नाही असंच अनेकजण म्हणतात. जेवताना आम्हाला साग्रसंगीत ताट समोर दिसावं लागतं असं म्हणणारेही कमी नाहीत. आता या ताटामध्ये पोळी आणी भात आलाच. (eating roti and rice in lunch dinner is beneficial or not  )

भारतातील आहारामध्ये सहसा पोळी- चपातीचा समावेश 

भारतामध्ये खाण्याच्या सवयी कितीही वेगळ्या असल्या तरीही काही भाग वगळता इथं प्रत्येकाच्या ताटात भाताचा डोंगर आणि सोबतीला चपाती असतेच. याला जोड असते ती म्हणजे भाजी (Vegetables), वरण (Daal) किंवा तत्सम पदार्थांची. पण मुळात हीच पद्धत चुकतेय हे तुमच्या लक्षात आलं आहे का? 

पोळी, डोसा (Dosa), भात या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळं टाइप-2 डायबिटीजचा धोका उदभवतो. ICMR नं केलेल्या एका निरीक्षणातून समोर आलेल्या अहवालानुसार एखाद्या व्यक्तीनं आहारातून कार्बोहायड्रेट्स कमी केल्यास त्या व्यक्तीला मधुमेह अर्थात डायबिटीजचा (Diabetes) धोका कमी असतो. भारतीय या बाबतीत धोक्यात आहेत, कारण त्यांच्या आहारात 70 टक्के  कार्बोहायड्रेट्स, 20 टक्के स्निग्ध पदार्थ (Fats) आणि 10 टक्के प्रथिनं असतात. हे प्रमाण प्रचंड असंतुलित आहाराचं द्योतक आहे. 

हेसुद्धा वाचा : health Tips: च्यवनप्राशचं सेवन करणं 'या' लोकांना पडू शकतं महागात; कारण...

शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांनुसार भारतीयांनी आहारामध्ये carbohydrates 50 टक्क्यांहून कमी घ्यावेत आणि प्रथिनं ही सद्यस्थित 20 टक्क्यांनी वाढवावीत. बरं इथं लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे carbohydrates घेणं बंद केल्यास त्याचे थेट परिणाम शरीरावर होतात. 

मेंदूला आवश्यक असणाऱ्या ग्लुकोज (Glucose) वर याचा परिणाम होत असल्यामुळं सुरुवातीला फास्ट फूड आणि शीतपेयांचं अतीसेवन कमी करावं. 

आहारामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश 

तिथे तुम्ही जर आहारातून चपाती आणि भाताचं प्रमाण कमी करत असाल तर याला पर्यायी पदार्थही शोधणं फायद्याचं ठरेल. इथं तुम्ही तांदळाऐवजी नाचणी आणि ज्वारी - बाजरीपासून तयार झालेले पदार्थ खाण्याला प्राधान्य देऊ शकता. तसंच Grilled Chicken, उकडलेली अंडी (Boiled Eggs), ऑम्लेट (omelette), पालेभाज्या, फळभाज्या, मोसमी फळं यांचा समावेश करु शकता. 

जेवणाच्या ताटातून पोळी आणि भात पूर्णपणे हद्दपार केला नाही तरी बेहत्तर, पण ताटात असणाऱ्या सर्व गोष्टी या समप्रमाणात असतील याची काळजी घेणंसुद्धा आरोग्यासाठी हितकारक असेल. यामध्ये भाज्यांपासून कोशिंबीर आणि भाकऱ्यांपर्यंत सर्वच पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता. 

सकस आहाराच्या सेवनासोबतच नियमित व्यायाम करणं, जेवणानंतर लगेच न झोपणं या अशा सवयी अंगी बाणवून तुम्ही निरोगी आयुष्याकडे वाटचाल करु शकता.